घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु होणार -रविवारी भूमिपूजन …(व्हिडीओ)
पुणे- तब्बल ४० वर्षे लागली पण आता उद्या घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी भूमिपूजन होते आहे , मोठ्या आनंदाने नगरसेवक उमेश गायकवाड सांगत होते . नगरसेवक होवून अडीच वर्षे झालेल्या गायकवाड यांच्या चेहऱ्यावर या कामाच्या यशाबद्दल अभिमान आणि आनंद ओसंडून वाहने साहजिक होते .पण शब्दात जणू वर्णन करणे त्यांना कठीण होते .आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत आपल्या हातून काही चांगले काम घडावे असे अनेकांना वाटत असते आणि अशा कामांच्या यशस्वी टप्प्यावर आणि तेही पहिल्याच टर्म मध्ये होणारा आनद काही औरच असतो हे त्यांच्या चेहऱ्या वरून स्पष्ट दिसत होते .
घोरपडी गावातील अरुंद रस्ते आणि दोन रेल्वे फाटके ..दिवसभरातून सुमारे ७० रेल्वे येथून जातात आणि प्रत्येक वेळी किमान २० मिनिटे फाटक बंद राहते म्हणजे वाहतुकीचा बट्ट्याबोळ .. गेली कित्येक वर्षे येथील वाहनचालक हि कोंडी घेऊन जगत आले .मिरज रेल्वे फात्वार दोन्ही बाजुनी अशा वेळी तुफान गर्दी असते .तर दौंड मार्गे जाणाऱ्या रेल्वे फाटकावर बी टी कवडे रोड आणि शिर्के कंपनी कडे जाणारी वाहतूक मुंढवा आणि घोरपडी दुहेरी रस्ता यामुळे विचारता सोय नाही .वेळ,इंधन यांचा सातत्याने होणारा अपव्यय नशिबी पुजलेला जणू इथे .पण आता सातत्याने केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडे आपल्या नेत्यांच्या महापालिकेतल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाठपुरावा करून उमेश गायकवाड यांनी उड्डाणपुलाचे काम मार्गी लावले आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील , खासदार गिरीश बापट ,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आमदार आणि भाजपच्या अध्यक्ष माधुरी मिसाळ , दिलीप कांबळे, योगेश टिळेकर ,महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आदीमान्यवरांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाचे भूमिपूजन होते आहे आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत येथे उड्डाणपूल कार्यान्वित करण्याचा गायकवाड यांचा प्रयत्न आहे .