पुणे -मरहूम हाजी हाशमोद्दीन एम. तांबोळी एज्युकेशनल सोशल अँड चॅरिटेबल ट्रस्ट व अंजुमन इतेहाद तंबोलीयन समाजाच्यावतीने तांबोळी समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला . गंज पेठमधील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन पुणे शहराचे महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे , शिक्षणमहर्षी पी. ए. इनामदार ,अंजुमन इतेहाद तंबोलीयन समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान हाशमोद्दीन तांबोळी, माजी आमदार मोहन जोशी , माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर , आरिफ बागवान ,उद्यकांत आंदेकर , सदानंद शेट्टी , हाजी अहमद चमडेवाले , मणियार समाजाचे अध्यक्ष सलीम मणियार , आत्तार समाजाचे अध्यक्ष इस्माईल आत्तार आदी मान्यवर उपस्थित होते .
या मेळाव्याचे उदघाटन पुणे शहराचे महापौर मुक्ता टिळक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , तांबोळी समाजाने एकत्र येणे हि काळाची गरज बनली आहे . गेले ४० वर्षात पहिल्यांदाच तांबोळी समाजाचा मेळावा हाजी उस्मान हाशमोद्दीन तांबोळी यांनी घेतला आहे . पुणे शहरातून तांबोळी समाजाची उभी राहिलेली चळवळ राज्यभर राहिली पाहिजे .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले कि , तांबोळी समाजाचे काम राज्यभरात काम कौतूकास्पद आहे . त्यामुळे समाजाने एकत्रित यावे .
यावेळी शिक्षणमहर्षी पी. ए. इनामदार यांनी सांगितलॆ कि , तांबोळी समाजाने आपल्या पारंपरिक व्यवसायाबरोबर आधुनिक शिक्षणाची कास धरली पाहिजे . हाजी उस्मान हाशमोद्दीन तांबोळी हे समाजासाठी मदत करीत असतात . त्यामुळे समाजाने देखील प्रगती केली पाहिजे .
या मेळाव्यामध्ये ३५० वधू व १२० वरानी सहभाग घेऊन आपला परिचय करून दिला . यावेळी तांबोळी समाज युथ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी उस्मान चिरगुद्दीन तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत हाजी उस्मान हाशमोद्दीन तांबोळी यांनी केले तर आभार हाजी अल्ताफशेठ हाशमोद्दीन तांबोळी यांनी मानले