पुणे,दि.13 नोव्हेंबर 2017- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत यार्डी संघाने गालाघर संघाचा तर अॅटॉस् संघाने सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
पुना क्लब क्रिकेट मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत विघ्नेश मोहन नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर अॅटॉस् संघाने सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने दोन चेंडू बाकी असताना 19.4 षटकात सर्वबाद 135 धावा केल्या. यात शंतनु बुट्टे पाटीलने 38 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 135 धावांचे लक्ष विघ्नेश मोहनच्या नाबाद 55 तर आनंद सावंतच्या 47 धावांच्या जोरावर अॅटॉस् संघाने केवळ 17.5 षटकात 4 बाद 136 धावांसह पुर्ण करत विजयी सलामी दिली. विघ्नेश मोहन सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत स्वप्निल घाटगेच्या 76 धावांच्या जोरावर यार्डी संघाने गालाघर संघाचा 83 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना यार्डी संघाने 20 षटकात सर्वबाद 190 धावा केल्या. यात तरूण नोटानी याने 38 धावा करून स्वप्निलला सुरेख साथ दिली. 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंकित राव, गौतम तुळपुळे व जीवन गोसावी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे गालाघरसंघाचा डाव 20 षटकात 9 बाद 107 धावांत गोरद झाला. स्वप्निल घाटगे सामनावीर ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन आयडीयाज् अ सास इंडियाचे संचालक प्रशांत केएस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयडीयाज् अ सास इंडियाचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज् अ सास इंडियाच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स् आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 19.4 षटकात सर्वबाद 135 धावा(शंतनु बुट्टे पाटील 38, प्रफुल्ल मानकर 26, स्वप्निल चिखले 21, विघ्नेश मोहन 3-24, ईशान नारंग 4-29) पराभूत वि अॅटॉस्– 17.5 षटकात 4 बाद 136 धावा(आनंद सावंत 47, विघ्नेश मोहन नाबाद 55, गिरिष ओक 3-14) सामनावीर- विघ्नेश मोहन
अॅटॉस् संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
यार्डी- 20 षटकात सर्वबाद 190 धावा(स्वप्निल घाटगे 76, तरूण नोटानी 38, जीवन गोसावी 26, सिध्दार्थ शर्मा 2-43, गौरव बाजपई 2-36) वि.वि गालाघर- 20 षटकात 9 बाद 107 धावा(तन्मय आचार्य21, अंकित राव 3-14, गौतम तुळपुळे 2-18, जीवन गोसावी 2-19) सामनावीर- स्वप्निल घाटगे
यार्डी संघाने 83 धावांनी सामना जिंकला.