पुणे: बंगळुरू येथे पार पडलेल्या आयजीयू साऊथर्न इंडिया कुमार गोल्फ अजिंक्यपद 2019 स्पर्धेत पुण्या
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आर्यमानने या स्पर्धेतील क गटात उपविजेतेपदाचा मान मिळवला.
आर्यमानने एकूण तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील की गटात 69, 71 व 68 अशा तीन फेऱ्यांमधील गुणांबरोबरच एकूण 2 अंडर पार अशा गुणांकाची नोंद करीत दुसरा क्रमांक पटकावला. बंगळुरू येथे जाहली आयजीयू साऊथर्न इंडिया कुमार गोल्फ अजिंक्यपद 2019 ही स्पर्धा भारतातील सर्वोत्तम व प्रतिष्ठित अशा 4 कुमार गटाच्या स्पर्धांमधील एक स्पर्धा मानली जाते. तसेच या स्पर्धेत पदक मिळविण्यात यशस्वी ठरलेला आर्यमान हा महाराष्ट्राचा एकमेव गोल्फपटू ठरला.