पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे 14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत जीएआयएल, इंडियन ऑईल, बीपीसीएल या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत सांघिक गटात उपांत्यपूर्व फेरीत इंडियन ऑईल संघाने एनआरएलचा 2-0असा पराभव केला. यामध्ये ब्रिजेश दमानीने पंकज रॉय 201-51असा तर, ध्वज हरियाने आपल्या खेळात 94 गुणांचा ब्रेक नोंदवला व सईद तझुद्दीन अली अहमदचा 200(94)-10असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मनन चंद्रा, एस श्रीकृष्णन यांच्या विजयी कामगिरीच्या सामन्यात बीपीसीएल संघाने एमआरपीएल 2-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. गतविजेत्या ओएनजीसी संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.
जीएआयएल संघाने ऑईल संघाचा 2-0 असा पराभव केला. यात आशुतोष पाधीने ए कमलपुरी याचा 200-50 असा तर इशप्रित चड्डाने याने आपल्या खेळात 94 गुणांचा ब्रेक नोंदवला व तुलन बरुआ याचा 200(94)-88 असा पराभव करत विजय संपादन केला.
स्पर्धेचे उदघाटन बीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे, क्लबच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव शशांक हळबे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सांघिक गट: उपांत्यपूर्व फेरी:
इंडियन ऑईल वि.वि.एनआरएल 2-0(ब्रिजेश दमानी वि.वि.पंकज रॉय 201-51; ध्वज हरिया वि.वि.सईद तझुद्दीन अली अहमद 200(94)-10);
बीपीसीएल वि.वि.एमआरपीएल 2-0(मनन चंद्रा वि.वि.आतिश श्रीवास्तव 201-25; एस श्रीकृष्णन वि.वि.जे पी शेट्टी 200-38);
जीएआयएल वि.वि.ऑईल 2-0(आशुतोष पाधी वि.वि.ए कमलपुरी 200-50; इशप्रित चड्डा वि.वि.तुलन बरुआ 200(94)-88)