पुणे- नेपाळमधील लॉन टेनिस स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती ऋतुजा चाङ्गळकर, श्रीलंकेत कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारे अर्णव अन्नछत्रे व हृतिका महाजन, चेन्नई येथील योगा स्पर्धेत रौप्य पदक विजेती आर्या इनामदार, सहभागी ईश्वरी दांडगे, ङ्गिलिपाईन्समध्ये जिमनॅस्टिक्स स्पर्धेत कास्य पदक पटकाविणारी गौरी जरांडे आणि सिंगापूरमधील जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा अनिष पटवर्धन या डीईएस सेकंडरी स्कूलमधील सात आंतरराष्ट्रीय खेळाडुंसह राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी आठ व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी पाच खेळाडूंचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. रोलर स्केटिंगमधील कास्य पदक विजेता सिध्दांत कांबळे, मु‘याध्यापिका सुजाता नायडू, उपमु‘याध्यापिका ज्योती बोधे, पर्यवेक्षिका मंजुषा बोरावके, सरीता स्वाधी आणि क‘ीडा शिक्षक प्रीतम जोशी, नेत्रा वेदपाठक, श्रीकांत खुटवड यांनी संयोजन केले.