पुणे-‘अलंकृता’ हा डॉ.अभिजित नातू यांची संकल्पना असलेला आणि डॉ.रेवा नातू यांची स्वरश्रीमंती लाभलेला बहारदार आणि देखणा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाचे दर्जेदार निवेदन मंजुषा उकिडवे आणि डॉ.मृणाल धोंगडे यांनी केले.अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक अश्या संवादाने त्यांनी या स्वर मैफिलीचे सूत्र गुंफले होते.आतिशय अनमोल असे संस्कृतीचा ठेवा असलेले अलंकार शब्द सुरांच्या माध्यमातून आलंकृत होत मैफल सजली होती.
पारंपारिक नथ,हार,पोहेहार ,चपलाहार,तन्मणी,वाकी, वाळे, पैंजण,एक स्तराची-कांची,आठ स्तरांची-मेखला,सोळा स्तरांची-रसना ,असे भरजरी अलंकार द्रुकश्राव्य माध्यमातून दाखवण्यात आले.वेगवेगळ्या प्रांतातून अलंकार कसे असतात ते कशापासून तयार करतात स्त्रियांना या अलंकारांची कशी आवड असते.हेसांगून गीतातून राजस्थानी मुन्दरी कोरस या मधून सादर केला.स्नेहल नाईक,आरती मांडके,सानिका सोमण,क्रांती साठे.यांची कोरससाथ एकसुरात होती.त्यावेळी तबलासाथ करणारे अक्षय शेवडे यांनी उत्तम ढोलक वाजवला.हेमंत पोटफोडे यांनी तालवाद्या बरोबरच शंख वाजवला त्यावेळी ऋषभ नातू यांनी गिटार साथ केली.त्यामुळे हा स्वरकोलाज जास्त उठावदार झाला.
रेवा नातू यांनी गेलेले “सूर्यकिरण मज भासे”हे पद पारंपारिक नाट्य गीताची आठवण करून देणारे ठरले.उमेश पुरोहित यांची संवादिनी साथ तर छानहोतीच पण त्यांनी गेलेली नाट्यसंगीतातील साकीच्या धरतीवरील रचना उठावदार झाली. स्त्री धन म्हणून अलंकारांचे महत्व,पुरुषांचे अलंकारांची जंत्री सुद्धा सांगितली.बाळ लेणी ल्यायलेला’ परब्रह्म निष्काम तो हा’हि रचना डॉ .रेवा नातू यांनी गायली रसिकांनी त्याला टाळ्या आणि वन्समोअर दिला. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या मैफलीस लाभला.
संदर कार्यक्रमाचे लेफ्ट. कर्नल फडकर सर यांच्या हस्ते ऊद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता व त्याबरोबर कार्यक्रमात गोळा झालेली ऐच्छिक देणगी ‘भारत के वीर’ या शहीद जवाणांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणार आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक श्री. आशिष कांटे यांनी दिली. हीच या कार्यक्रमाची सामाजिक खासियत ठरली.