पुणे -पुण्याचं सांस्कृतिक लेणं असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची धूळधाण उडवून तिथे मेट्रो स्टेशनाचा घाट घालण्याचा इरादा ठेवणाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक आणि चित्रपट निर्माते विशाल धनवडे यांनी ‘महापालिकेच्या मालकीच्या सावरकर भवनाच्या इमारतीच्या जागेचा पर्याय सुचविला आहे. बालगंधर्व ऐवजी मेट्रो चे स्टेशन सावरकर भवन या इमारतीच्या जागेवर उभारावे आणि त्यास स्वातंत्र्यवीर सावरकर मेट्रो स्थानक असे नाव द्यावे असे त्यांनी म्हटले आहे . सध्या या इमारतीत महापालिकेने मोटारी सह अनेक व्यावसायिकांना जागा भाड्याने दिलेल्या आहेत . बँका, टेलिफोन अशांचा त्यात समावेश आहे . अशा मार्गाने महापालिका तिथून किती आर्थिक उत्पन्न मिळविते ? त्यापेक्षा तिथे मेट्रोचे स्टेशन उभारून जाहिराती द्वारे तिथून महापालिकेने उतपन्न मिळवावे , परंतु बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेला धक्का लावू नये असे असे विशाल धनवडे यांनी म्हटले आहे .