पुणे- भव्यतेच्या नावाखाली बालगंधर्व रंग मंदिर तोडू देणार नाही असा स्पष्ट इशारा देत मेट्रो च्या नावाखाली बिल्डरांची लुट करू नका ,झोपडपट्टीला अंतर्गत रस्ते लाईट सुविधा देतो तशा कर भरणाऱ्या सोसायट्यांमध्ये देखील द्या ,अशा अनेक मागण्या आज अर्थसंकल्पावर भाषण करताना माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केल्या .
शिवसृष्टी होण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा तुम्ही घेणार आहात त्या शेतकऱ्यांना जमिनीची किंमत देण्यासाठी काही तरतूद या बजेट मध्ये केली नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला .
बालगंधर्व रंगमंदिर तुम्हाला भव्य दिव्य करायचे असेल , चांगली गोष्ट आहे , पण आहे ते बालगंधर्व तोडून ..तिथल्या सांस्कृतिक वाऱ्याला थोपवून ठेवू नका , त्यापासून पुणेकरांना वंचित ठेवू नका , आपल्याकडे एखादा प्रकल्प हाथी घेतला कि तो 5 -5 वर्षे रखडतो . असे झाले तर पुणेकर रसिक बालगंधर्व च्या सांस्कृतिकतेला मुकतील . अशी भीती हि त्यांनी व्यक्त केली .आम्हीआधुनिकतेच्या नावाखाली बालगंधर्व कदापि पूर्णतः तोडून देणार नाही असा इशारा त्यांनी दिला .
1) स्मार्ट सिटी अंतर्गत झोपडपट्ट्यांचा समावेश करा .
2) झोपडपट्ट्यांना अंतर्गत रस्ते ,लाईट देतो तशा सुविधा कर भरणाऱ्या सोसायट्यांमध्ये का देत नाही ?
3)मेट्रोच्या नावाखाली कर वाढवून बिल्डरांची लुट करू नका .
4)खडकवासला धरणाचा गाळ काढण्याकडे का दुर्लक्ष करता ?
दीपक मानकर यांचे संपूर्ण भाषण ..https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2036664833242820/ या फेसबुक पेजवर पहा ..
येथे पहा भाषणाची एक झलक …