खासदार वंदना चव्हाण यांचा गार्गी पुरस्काराने सन्मान
पुणे :
माईर्स एमआयटी स्कूल अॅण्ड गव्हर्नमेंट, व भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसांच्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांच्या हस्ते खासदार वंदना चव्हाण यांना गार्गी पुरस्काराने तर ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, संगणकतज्ज्ञ विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी मान्यवर उपस्थित होते.
वंदना चव्हाण म्हणाल्या की, चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी तरुणाईने राजकारणात येणे गरजेचे आहे. तर महापौर प्रशांत जगताप यांनी आपल्या भाषणात बोलताना भारतीय राजकारणात बदल घडवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा लौकीक वाढविण्यासाठी तरुणांनी राजकारणात येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.