पुणे-बैसाखी उत्सवानिमित्त शीख जनसेवा संघाच्यावतीने पुणे लष्कर भागातील न्यू क्लबमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पंजाबी गाण्यावर भांगडा नृत्य करण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन अजितसिंग राजपाल , जगजितसिंग खालसा व शीख जनसेवा संघाने केले होते .
या कार्यक्रमात चरणजितसिंग सहानी , संतसिंग मोखा , अजितसिंग राजपाल , भोलासिंग अरोरा , काश्मिरीलाल नागपाल , अमरजितसिंग टूटेजा , हरदीपसिंग राजपाल , दिलीप शिंदे , विनोद संघवी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी शीख बांधवानी पंजाबी गाण्याच्या तालावर ठेका धरला . यावेळी मनोरंजनाचा आनंद शीख बांधवानी लुटला .
बैसाखी उत्सव हा पंजाब मध्ये नवीन धान्य शेतामध्ये आल्याने शीख बांधव त्यांचा आनंदोत्सव साजरा करतात . खालसा पंथाची स्थापना बैसाखीला झाली आहे . घरामध्ये वाढलेली धनधान्य वृद्धी अशीच राहो सर्व जण आनंदित राहो . अशा पध्दतीने एकत्रित येऊन एकमेकांना बैसाखी उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात येतात . अशी माहिती अजितसिंग राजपाल यांनी दिली .