ओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांची सयुक्त कारवाई
जुन्नर /आनंद कांबळे –
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांनी सयुक्त कारवाई करून ओझर ता.जुन्नर येथून सोमनाथ राजाराम साळुंके वय 26 वर्षे रा. धनगरवाडी ता.जुन्नर यास त्याच्या कब्जातील 15 तलवारी सह सापळा लावून सोमवारी (१९/८/२०१९) ताब्यात घेतले.
सोमनाथ साळुंके वर यापूर्वी गुन्हे दाखल असुन तो कारखाना फाट्यावरून ओतूर च्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. तो दुचाकीवर पांढर्या गोणीमध्ये 15 तलवारी बांधून निघाला आहे अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून ओतूर पोलिसांची मदत घेऊन त्यास ओझर येथे ताब्यात घेण्यात आले.
सदर कार्यवाही श्री संदीप पाटील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री विवेक पाटील अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री.पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,श्री रमेश खुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओतूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार विश्वास खरात, सुनील ढगारे,राजु पवार,किरण कुसाळकर, मोसिन शेख या पथकाने ओतूर पोलीस स्टाफ यांनी केली.