पुणे :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीदिना निमित्त दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या(डिक्की) १४ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम येत्या शनिवारी १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत हॉटेल लेमन ट्री येथे होणार आहे. यावेळी डिक्कीचा १४ वर्षांचा प्रवास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजचे महत्त्व, चौथी औद्योगिक क्रांती आणि राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, विविध क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व डिक्की महाराष्ट्राचे मेंटॉर अशोक खाडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्की पश्चिम विभाग उपाध्यक्ष अविनाश जगताप,डिक्की नॅशनल वुमन विंगच्या मेंटॉर सीमा कांबळे, डिक्की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कांबळे,डिक्की पुणे अध्यक्ष अनिल ओव्हाळे उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम सशुल्क असून इच्छुक सभासदांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डिक्कीच्या वतीने करण्यात आली आहे.