पुणे- एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेड (एजीआयए) या भारतातील एका सर्वात मोठ्या टाइल्स कंपनीने महाराष्ट्रातील पुणे येथे ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम सुरू केले आहे. या 1,800 चौरस फूट क्षेत्रातील शोरूममध्ये सर्व प्रकारची उत्पादने असतील – सिरॅमिक वॉल व फ्लोअर टाइल्स, पॉलिश्ड व्हर्टिफाइड टाइल्स, ग्लेझ्ड व्हर्टिफाइड टाइल्स, आउटडोअर व पार्किंग टाइल्स. हे महाराष्ट्रातील 19वे ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम असेल.
कंपनीने एस. के. सिरॅमिक्सच्या सहयोगाने शॉप नं. 35/6, मार्बल मार्केट, आंबेगाव (बुद्रुक), पुणे-मुंबई महामार्ग, पुणे, महाराष्ट्र येथे शोरूम सुरू केले आहे. शोरूमचे उद्घाटन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते, एशियन ग्रॅनिटो इंडिया लि.चे संचालक भावेश पटेल व ग्रेस्टेक व्हिजनचे असोसिएट डायरेक्टर शौनक पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रेस्टेकचे एव्हीपी राहुल शर्मा, एजीएल टाइल्सचे सीनिअर जीएम विकास खन्ना, ग्रेस्टेकचे जीएम विवेक जैसवाल व सिनीअर आरएसएम सर्वेश द्विवेदी हे प्रमुख पाहुणे होते. एजीआयएलने बाजारातील रिटेल व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी आणि भारताच्या कानाकोपऱ्यात सेवा देण्यासाठी धोरण आखले आहे. एशियन ग्रॅनिटोने विविध उत्पादने दर्शवण्याच्या हेतूने जागेच्या उपलब्धतेनुसार निरनिराळी शोरूम सुरू केली आहेत.
याविषयी बोलताना, एशियन ग्रॅनिटो इंडिया लि.चे सीएमडी कमलेश पटेल म्हणाले, “आम्हाला पुणे या महाराष्ट्रातील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरात ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ सुरू करताना अतिशय आनंद होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील शोरूमची संख्या आता 19 झाली आहे. विविध डिझाइन व टेक्शर असलेल उत्पादने उपलब्ध असल्याने इंटिरिअर डेकोरेटर्स, आर्किटेक्ट्स व घरमालकाना आता सजावटीची उत्पादने म्हणून लोकप्रिय ब्रँडेड टाइल्सना पसंती देतात. सतत काहीरी वेगळे व खास शोधणाऱ्या व्यक्तींसाठी ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम आवश्यक आहे, असे आम्हाला वाटले व या शोरूमद्वारे आम्ही या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकू, अशी आशा आहे.”
एजीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश पटेल म्हणाले, “ग्राहकांशी थेट संवाद साधून कंपनीच्या रिटेल विक्रीमध्ये वाढ करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून शोरूम सुरू करण्यात आली आहेत. कंपनीने येत्या तीन वर्षांत रिटेल विक्रीतील हिस्सा सध्याच्या 35% वरून 50% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पर्यटन व हॉटेल उद्योगांमध्ये भरभराट असल्याने व रिअल इस्टेट व गृह क्षेत्रही स्थिरपणे वाढत असल्याने महाराष्ट्रातील टाइल्स उद्योगामध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. एजीआयएलचे महाराष्ट्रात डीलर-सब डीलरचे सक्षम जाळे असून ते येत्या 2-3 वर्षांत अनेक पटींनी वाढणार आहे. एशियन ग्रॅनिटो इंडिया लि. ग्राहकांसाठी फ्लोअर, वॉल व डेकोरेटिव्ह श्रेणीसाठी नवे व सर्वोत्तम कलेक्शन उपलब्ध करते.”
एशियन ग्रॅनिटो इंडिया लि. (एजीआयएल) 16 वर्षांच्या अल्प कालावधीत 2000 या वर्षातील दररोज 2,500 चौरस मीटरवरून सध्या अंदाजे 1 लाख चौरस मीटर (आउटसोर्सिंगसह) अशी प्रगती करून भारतातील एक सर्वात मोठी सिरॅमिक कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये सिरॅमिक फ्लोअर, डिजिटल वॉल, व्हिट्रिफाइड, पार्किंग, प्रोक्लेन, ग्लेझ्ड व्हिट्रिफाइड, आउटडोअर, नॅचरल मार्बल कम्पोझिट व क्वार्ट्झ आदींचा समावेश आहे.