जुई गडकरी (झी युवा – वर्तुळ)
– मला ख्रिसमस हा सण खूप आवडतो. या सणाच्या वेळी आजूबाजूचं वातावरण हे खूपच चिअरफूल आणि पॉसिटीव्ह असतं. मी एका कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थी होतीत्यामुळे हा सण मी लहानपणापासूनच साजरा करत आली आहे. मी शाळेत असताना आम्ही सर्व मुलं ‘जिंगल बेल’च गाणं गायचो, डेकोरेशन करायचो, शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आम्हाला मेजवानीदेखील मिळायची. यावर्षी मी माझ्या घरी ख्रिसमस ट्री डेकोरेट करणार आहे आणि मी खूप उत्सुक आहे.