तितिक्षा तावडे (झी युवा – तू अशी जवळी राहा)
माझ्यासाठी ख्रिसमस म्हणजे गोडधोड पदार्थ खाणं आणि थंडीच्या या वातावरणात मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करणं. मी गोव्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट शिकत होती तसंच लहानपणीपासून कॅथलिकशेजाऱ्यांच्या सहवासात मोठी झाल्यामुळे मला या सणाचं नेहमीच अप्रूप वाटतं. हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल आहे करणं माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न झालं आणि माझ्या वाट्याला तू अशी जवळी राहाया मालिकेतील मनवाची नवीन भूमिका देखील आली. त्यामुळे डबल सेलिब्रेशन असणार आहे. मी ख्रिसमस मिडनाईटला मास प्रेयरसाठी चर्चमध्ये जाणार आहे.

