सध्या लग्नसराई सुरू आहे. कलाकारांसह मालिकांमध्ये देखील लगीनघाई दिसत आहे. झी युवावरील तू अशी जवळी राहा मालिकेत देखील मनवा आणिराजवीर हे लग्नबेडीत अडकणार आहेत. लग्न अगदी मराठमोळ्या वैदिक पद्धतीत पार पडणार असून मेहंदी, हळदी, संगीत या सर्व समारंभाची लगबगमालिकेत दिसत आहे. मनवाच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊत सज्ज होऊन या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. नाळ चित्रपटातील जाऊ देन व या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रोहितने एक खास गाणं तयार करून मनवाच्या संगीत समारंभात सादर केलं. या गाण्याची झलक चाहत्यांना सोशलमीडियावर पाहायला मिळाली आणि या सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद देखील दिली. मनवा आणि राजवीरचा लग्न सोहळा रविवार ९ डिसेंबर रोजी ७ वाजता १तासाच्या विशेष भागात संपन्न होणार आहे.
रोहित म्हणतोय ‘मनवाच्या लग्नाला जाऊ दे न व…’
Date:

