युथफूल कन्टेन्ट सादर करून झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. झी युवावरील फुलपाखरू या
मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. मानस आणि वैदेहीची अनोखी प्रेमकहाणीसगळ्यानांच भावली. प्रेक्षकांचं प्रेम
आणि अखंड पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच १ वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. तसेच अल्पावधीतच फुलपाखरू मालिकेतील वैदेही
म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाचीधडकन झाली आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या
गळ्यातील ताईत बनला आहे. फुलपाखरूच्या तमाम चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे मालिकेत आता मानस आणि वैदेही
यांचं नातं एक पाऊल पुढेजाऊन ते दोघेही लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत आणि या लग्न सोहळ्याची सुरुवात मेहंदीच्या
दिमाखदार समारंभाने होणार आहे.वैदेहीचा मेहेंदीचा समारंभ तिच्या घरीच पार पडणार असून तिचे घर देखील एका नव्या नवरीप्रमाणे सजवले आहे. मेहंदीचा समारंभ
घरगुती असला तरी तितकाच दिमाखदार पार पडणार आहे. सर्व कुटुंबीय तसेच मित्रपरिवार आणिनातेवाईक या समारंभात आणि
वैदेहीच्या आनंदात सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांना हा आनंद सोहळा अनुभवायला मिळणार आहे. मेहंदी समारंभात सर्व पाहुणे
आनंदाने थिरकणार आहेत. नवरी वैदेही साध्या पेहेरावात देखीलअत्यंत सुंदर दिसतेय. पण तिच्या या समारंभात काही आगंतुक
देखील येणार आहे. बुरखा घालून २ बायका तिच्या मेहंदी समारंभात सहभागी होणार आहेत. या बायका कोण असणार आहेत?
त्या अशा गुप्तपणे या समारंभात कासहभागी झाल्या आणि त्यांचा काय उद्देश आहे? त्यांच्या येण्यामुळे काही अडचण निर्माण
होणार का? हे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहे.