तो वय 30 , स्ट्रगलिंग एक्टर, वेगवेगळ्या ऑडिशन्स देत फिरतोय. बाबा ड्रायव्हर, त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा स्ट्रगलपण आहे, पण त्याचं एकच ब्रीद वाक्य आहे. ‘सतत हसायचं आणि हसवायचं’- स्माईल प्लीज. एकअसा तरुण जो कोणत्याही परिस्थितीत हसणं सोडत नाही आणि इतरांना हसवायला सुद्धा. आणि हाच कथेचा सार आहे. झी युवावरील गुलमोहर या दोन एपिसोड च्या मालिकेतील पहिली कथेत २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता श्रेयस आणि गिरीजा प्रेक्षकांना म्हणणार आहेत ‘स्माईल प्लिज’.
कोणतही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं असो, आई मुलाचं किंवा नवरा बायकोचं. नातेसंबंध आणि त्यात असणारं प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून झी युवा गुलमोहर या मालिकेद्वारे घेऊन येत आहे. या मालिके द्वारे प्रेक्षकांचे अनेक आवडते कलाकार झी युवाच्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. स्माईल प्लिज गुलमोहर या मालिकेतील पहिली कथा असून श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक गोडबोले यांचे प्रेम आणि प्रेमापेक्षाही अतिशय वेगळ्या दर्जाचं बॉण्डिंग या कथेद्वारे उलगडत जाईल. या कथेत उदय सबनीस आणि उदय टिकेकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत.