ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. संगीत एक अशी प्रक्रिया आहे की, तिच्या माध्यमातून मानवी भावनांना सृजनात्मक रूप दिले जाऊ शकते. संगीतच आपल्या मनाला तसेच मेंदूला आनंद प्रदान करीत असते. जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्यांला संगीत आवडत नसेल. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे. प्रतिभा, अभिरुचि व परिश्रम घेणार्या कलाकाराला संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. पण केवळ काही व्यक्तींना परमेश्वराकडून ही देणगी मिळलेली असते . मात्र, या दिशेने करियरची वाटचाल सुरू करण्यासाठी भरपूर अभ्यास व सरावाची आवश्यकता असते. आणि त्याच बरोबर एका मोठ्या संधीची..व्यासपीठाची आवश्यकता असते आणि हीच संधी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची आवडती वाहिनी , “झी युवा” आपल्यासाठी घेऊन येत आहे .
महाराष्ट्रात मल्टीटॅलेंटेड कलाकारांची काही कमी नाही. गेल्या काही वर्षामध्ये नव्या दमाचे आणि नव्या संकल्पनांनी भरलेले अनेक प्रतिभावान संगीतमय कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा आले आणि त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला. पण महाराष्ट्राभर आजही असे असंख्य कलाकार आहेत जे एका अश्या संधीच्या , व्यासपीठाच्या प्रतीक्षेत आहेत जिथे त्यांच्यातील ती वेगळी कला बेदिक्कत सादर करू शकतील. कला ही अनेक प्रकारची असते . पण ती नावाजली जाते प्रेक्षकांमुळे आणि अश्या कलेला व्यासपीठ उपलबध करून देणे महत्वाचे असते त्यामुळेच झी युवा ही वाहिनी संगीत सम्राट सारखा एका वेगळ्या दर्ज्याचा अनोखा कार्यक्रम महाराष्ट्रातील त्या तमाम उभरत्या संगीत सम्राटांसाठी घेऊन येत आहे .
संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध , माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे . या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही तर संगीत सम्राट हा कार्यक्रम अश्या कलाकारांसाठी आहे जे कोणत्याही वाद्द्यापासून वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून सुमधुर संगीत बनवू शकतील . या कार्यक्रमात मुख्यतः गायन , वाद्य वाजवणे , तोंडाने आवज काढून संगीत बनवणे ( Acapella , Beat Boxing ) असे परफॉर्मन्स सुद्धा असतील. या कार्यक्रमात तुम्ही एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होऊ शकता . वयाच्या ४ वर्षांपासून ते आयुष्याच्या कोणत्याही वयातील मराठी बोलणारे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. ढोलपथके , बँड , गावागावातील संगीत , प्रत्येक प्रकारचं संगीत या कार्यक्रमात पाहायला मिळेल . महाराष्टात ज्यांच्या रक्तात संगीत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे .
संगीत सम्राट हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे वेगळा ठरणार आहे .छोट्या पडद्यावर या प्रकारचा टॅलेंट हंट आजपर्यंत कोणीही पहिला नसेल . या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स ३ मे पासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु होणार आहेत . ३ मे ला नागपूर , ६ मे ला औरंगाबाद , ८ मे ला नाशिक , १० मे ला पुणे , १२ मे ला कोल्हापूर आणि १४ मे ला मुंबई अश्या ह्या ऑडिशन्स होतील . संगीत सम्राट ही संकल्पना संपूर्णपणे झी युवा या वाहिनीची असून लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना झी युवावर या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे .