गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात.गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्त साधत झी युवावर अवधूत गुप्ते त्यांच्या संगीताची गुढी सरगममध्ये उभारणार आहेत . . या आठवड्यात २९ मार्च आणि ३० मार्च ला सरगमच्या प्रेक्षकांना एक वेगळाच स्वरानुभव मिळणार आहे. अवधूत गुप्ते हे नाव संगीत क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे. ते उत्तम गायक तर आहेतच पण उत्तम संगीतकार, सुद्धा आहेत. त्याच बरोबर चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक अश्या अनेक उपाध्या त्यांच्या नावासोबत आहेत. त्यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत सुद्धा देतात. अवधूत ने मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही त्याने केले आहे.सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक-अधिक-संगीतकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत ह्यांच्यासोबत त्याने बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. शाहरुख खान च्या फॅन सिनेमातील जबरा फॅन चे मराठी गाणे गौण शाहरुख खान ला पार्श्वगायन करण्याचा मान अवधूत गुप्ते यांनाच मिळाला.
सरगम या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, गुढी पाडव्याच्या निमित्ताने जय जय महाराष्ट्र माझा हे गाजलेले गाणे गाणार आहेत. त्याच बरोबर कांदे पोहे, ही गुलाबी हवा, हे लंबोदर , दिपाडी दीपांग ही गाणी पहिल्या भागात तर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल , रॉंग नंबर , आम्ही लग्नाळू , सखे तुझ्या नावाचं येडं लागलं , आणि परी म्हणू की सुंदरा ही गाणी गाणार आहेत . अवधूत त्यांचे सगळ्यात प्रसिद्ध गाणे ऐका दाजीबा आपल्याला एका वेगळ्याच अंदाजात ऐकवणार आहेत. २९ आणि ३० मार्च बुधवार आणि गुरवार रात्री ९ हे प्रेक्षकांना गुढीपाडवाची भेट झी युवाकडून मिळणार आहे .
सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत .”सरगम” या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.