“बंध रेशमाचे “प्रेम हे” ची चौथी कथा झी युवावर

Date:

प्रेमाची भाषा वेगळीच असते. ती सांगायला शब्द लागत नाहीत. प्रेम करणाऱ्यांना एकमेकांच्या नजरेतून प्रेम जाणवते. ही गोष्ट आहे दोन अश्या लोकांची ज्यांचे स्वतःचे आयुष्य एका वळणावर येऊन थांबले आहे. इशा आणि प्रसाद आणि यांच्यातील दुआ आहे प्रसादच पाळणाघर आणि ईशाचा मुलगा अद्वैत. प्रेम कधी कोणामध्ये आणि कोणत्या वळणावर होईल खरंच सांगू शकत नाही. “प्रेम हे” ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे “बंध रेशमाचे “. येत्या सोमवार २० मार्च आणि मंगळवार २१ मार्च ला रात्री ९ वाजता सुनील बर्वे आणि वीणा जामकर यांच्या तगड्या अभिनयाने सजलेली एक सुंदर निरागस प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.

 

इशा एक स्वावलंबी स्त्री. एडव्हर्टाइसिंग प्रॉफेशनल. नवऱ्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ती तिचा मुलगा अद्वैतबरोबर नवीन शहरात आलीय. अद्वैत लहान असल्यामुळे कामाला जाताना मुलासाठी घराजवळच पाळणाघर ठरवते. या पाळणाघराचा मालक आहे प्रसाद रणदिवे. एक अविवाहित पण हसतमुख आणि लहान मुलांमध्ये रमणारा , पाळणाघर धंदा म्ह्णून न पाहणारा ४० -४५ मधील माणूस. सुरुवातीला इशाला प्रसादच लहान मुलांसारखं वागणं जराही आवडतं नसत. पण जशी जशी ती त्याला ओळखू लागते तशी तशी ती प्रसादच्या प्रेमात पडू लागते. पण घटस्फोटित इशा आणि अविवाहित प्रसाद यांच्यात अजूनही काही असतं ज्यामुळे ही गोष्ट वेगवेगळी वळण घेते. इशा आणि प्रसाद चे प्रेम फुलते कि खोट्या समाजासमोर झुकते. हे सर्व पाहण्यासाठी झी युवावरील प्रेम हे या मालिकेतील “बंध रेशमाचे “. ही गोष्ट पाहणे उत्कंठावर्धक नक्कीच ठरेल,

 

“बंध रेशमाचे” ही झी युवाची संकल्पना असून सुनील बर्वे आणि वीणा जामकर हे मुख्य भूमिकेत आहेत, तर गणेश पंडित यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे. दर सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता वेगवेगळ्या कथांतून “प्रेम हे”झी युवावर उलगडत जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरुड मधील रस्ते, पाणी प्रश्नी मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक

वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करा! महापालिका आयुक्तांसोबत...

वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा थाटात साजरा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात आयोजन पुणे :...

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७५ वा जन्मोत्सव व सिंधी नववर्षाचा आनंदोत्सव

पुणे : 'आयो लाल झुलेलाल'च्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची...