Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“शौर्य – गाथा अभिमानाची ” वेगवेगळे गुन्हे आणि वेगवेगळ्या तपास पद्धती

Date:

नागरिकांच्या रक्षणाचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने बजावत असताना, काही गुन्हे असे घडतात, की ते उलगडताना पोलिसांच्या चातुर्याची कसोटी लागते. कधीकधी अशा तपासात काही संवेदनशील पैलू समोर येतात आणि गुंता आणखीच  वाढत जातो. या आठवड्यात  झी युवावर “शौर्य – गाथा अभिमानाची ”  मालिकेत पाहायला मिळणाऱ्या दोन्ही गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. पहिली केस हि महिला पोलीस अधिकारी मीना पाटील यांची ,  नाशिक मध्ये एका निर्जन रस्त्यावर मॅकेनिक राजेंद्र जगदाळे नामक व्यक्तीच्या खुन झाला पण  याचे काहीच धागेदोरे सापडत नव्हते ; संशय मात्र त्याच्याच नातेवाईकांवर  होता.  हि केस ज्या हुशारीने मीना पाटील यांनी सोडवली याची दाद दिली पाहिजे आणि दुसरी कथा आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांची . एक २४ वर्षाची मुलगी सोलापूरहून पहिल्यांदाच मुंबईमध्ये स्वतःच स्वप्न पूर्ण करायला आली होती आणि मुंबईत उतरता क्षणीच तिच्यावर एका तरुणाने ऍसिड हल्ला केला. पोलिसांचा तपास सुरु झाला पण दरम्यान ती मुलगी मेली पण पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावले आणि त्या क्रूर तरुणाला सोलापूरमधून  पुराव्यांसकट शोधून काढले. या दोन्ही कथा शुक्रवार दिनाक २७ जानेवारी आणि शनिवार दिनाक २८ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पाहायला मिळतील.

 

राजेंद्र जगदाळे नाशिक मध्ये एक मॅकेनिक होता . बायको ज्योती आणि मुलगी सुप्रिया हे त्याच कुटुंब . राजेंद्र चा मेव्हणा प्रवीण हा एक सक्रिय गुंड होता . आणि त्याची बायको मंगला हि त्याला पूर्णपणे साथ देत होती . जेव्हा राजेंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा पोलिसांना या सर्वच नातेवाईकांचा संशय आला . पण पुरावा मिळत नव्हता .महिला पोलीस अधिकारी मीना पाटील या केसची  कसून चौकशी करत होत्या . त्यांची टीम प्रत्येकावर पाळत ठेवून होती . आणि शेवटी ठोस पुरावे मिळायला सुरु झाले ज्योतीचे विवाह बाह्य संबंध होते , मुलगी सुप्रियाचे ३  प्रेम प्रकरणं  सुरु होते , तर प्रवीण बरोबर राजेंद्रचे पैशावरून नेहमीच खटके उडत होते. पोलिसांनी कल्पकतेने एका एक पुरावा जमवत कश्याप्रकारे हि केस  सोडवली आणि आरोपीपर्यंत मीना पाटील कश्या  पोहचल्या हे आपल्याला या शुक्रवारी दिनांक २७ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पहायला मिळेल .

 

मुंबई बाहेरून हजारोंच्या संख्येने लोक या मायानगरीत आपलं स्वप्न पूर्ण करायला येतात . प्राची जगताप हि त्यातलीच एक .सोलापूरहून नोकरीसाठी मुंबईमध्ये आलेलय प्राचीला मुंबईत  तीच असं स्वागत होईल असं  स्वप्नातही  वाटलं नसेल . अतिशय हुशार अशी प्राची मुंबईत नोकरीसाठी आली आणि आल्या आल्या एका अज्ञात तरुणाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला . त्यातच तिचा जीव गेला . वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मात्र हे मनावर घेतले . प्रेमप्रकरण किंवा प्रेमभंग  या दिशेने तपास सुरु असताना संशयाची सुई तिचे तुटलेल्या लग्नातील नवऱ्यावर होती. पण तो मात्र निरपराध निघाला . तिच्यावर ऍसिड हल्ला का झाला याबद्दल काहीच पुरावा मिळत नव्हता . पण एकेदिवशी पोलिसांच्या हाती अशी एक गोष्ट मिळाली त्यामुळे अपराधी हा सोलापूरचाच आहे हे स्पष्ट झाले पण कोण हे कळले नव्हते . शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी एक युक्ती केली आणि प्राचीच्या तेराव्याच्या दिवशी पोलिसांना  क्रूर गुन्हेगार सोलापूर मध्येच गवसला. हि थरारक गोष्ट   शनिवार  दिनांक २८ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पहायला मिळेल .

 

या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंटचे सचिन मोहिते, तर लेखन लेखक अभिजीत पेंढारकर यांनी, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आ

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...