आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारे अभिनेता सचिन पिळगांवकर यांचे खुमासदार सूत्रसंचालन, संस्कृती बालगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली गणेशवंदना तसेच मल्ल्खांबाच्या माध्यमातून जवानांना दिलेली अनोखी मानवंदना, विनोदाने रंगलेली ‘नोटाबंदी’, ‘सैराट’, ‘पॅालिटीकल रामलीला’ ही स्कीटस, मानसी नाईक, वैभव तत्ववादी, पूजा सावंत ऋतुजा यांचा नृत्याअविष्कार, दर्दी रसिक झी टॅाकीज यशाला कशी दाद देतील याची अभिनेता सचिन पिळगांवकर व वैभव मांगले यांनी घेतलेली खुशखुशीत दखल तसेच पुष्कर क्षोत्री, हृषीकेश जोशी, संदीप पाठक यांनी सादर केलेला ‘कलाकारांची मंदिरे’, ‘टॅाकीज फर्माईश’ या भन्नाट स्कीटचा धमाका, झी टॅाकीजच्या यशाला नृत्यातून केलेला सलाम, अशा बहारदार कार्यक्रमांची टॅाकीज नाईट्स नुकतीच जल्लोषात रंगली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या टॅाकीज नाईट्सचा आस्वाद २८ मार्चला दुपारी १२.०० वा. सायं. ७.०० वा. झी टॅाकीजवर प्रेक्षकांना घेता येणार आहे.
प्रादेशिक वाहिन्यांच्या जाळ्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करत महाराष्ट्राच्या महावाहिनीने अर्थात झी टॅाकीज वाहिनीने गेले नऊ वर्षे आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. सुपरहिट चित्रपटांचे प्रीमिअर आणि दर्जेदार नाविन्यपूर्ण कार्यक्रमांमुळे इतर वाहिन्यांच्या तुलनेत झी टॅाकीज सातत्याने वरचढ ठरलं आहे. झी टॅाकीज वाहिनीने नऊ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करीत दहाव्या वर्षात पदार्पण केले. हे यश कलाकारांसोबत साजरे करत टॅाकीज नाईट्स सारख्या आगळ्या कार्यक्रमाची मेजवानी दिली आहे. रसिकप्रेक्षकांशी व कलाकारांशी असलेले नाते दृढ करण्यासाठी झी टॅाकीजने टॅाकीज नाईट्स या अनोख्या कार्यक्रमाची निर्मिती केली. वाहिनीची लोकप्रियता लक्षात घेत कलाकार व प्रेक्षक यांचा एकत्रित मेळ साधण्याचा झी टॅाकीजचा प्रयत्न निश्चितच हटके आहे. निखळ मनोरंजनाचा ध्यास घेत, ‘झी टॅाकीज’ने टॅाकीज नाईट्स या कार्यक्रमाद्वारे मनोरंजनाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईपासून शुभारंभ झालेल्या या कार्यक्रमाचा धमाका महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्येही रंगला. एक से बढकर एक’ अशा कलाविष्कारांनी रंगलेला हा सोहळा झी टॅाकीजच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. टॅाकीज नाईट्सचा आस्वाद २८ मार्चला दुपारी १२.०० वा व सायं. ७.०० वा. झी टॅाकीजवर अवश्य घ्या.