निखळ मनोरंजनाची हमी घेत प्रेक्षकांना नानाविध कार्यक्रमांची व चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या ‘झी टॉकीज’ने रविवार १० एप्रिलला असाच एका भन्नाट चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर प्रेक्षकांसाठी आणला आहे. राजकीय व्यंगावर खुशखुशीत भाष्य करणारा ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ या चित्रपटाचा आस्वाद १० एप्रिलला दुपारी १२.०० वा व सायं ६.०० वा घेता येईल.
मंत्री बनण्याच्या ईर्षेला पेटलेल्या नेत्यांमधल्या जुगलबंदीवर आधारलेला हा धमाल विनोदी चित्रपट आहे. पॉलिटीकल कॉमेडी असलेल्या या चित्रपटात नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे या दोन राजकीय दावेदारांच्या राजकीय कटकारस्थानाचा धमाकेदार खेळ प्रेक्षकांना पहाता येईल. नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे या दोन राजकीय दावेदारांमध्ये कोण सिकंदर ठरणार हे जाणून घेण्यासाठी १० एप्रिललचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर आवर्जून पहा.
या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, डॉ.विलास उजवणे, स्वप्नील राजशेखर, सिद्धेश्वर झाडबुके, विनीत भोंडे, मेडेलीना अलेक्झांड्रा, पूर्णिमा अहिरे, रसिका वझे, ज्योती जोशी, शरद शेलार, विनोद खेडकर, उज्वला गोड यांच्यासोबत अलोकनाथ आणि आशिष विद्यार्थी यांच्याही विशेष भूमिका आहेत.
या चित्रपटाची मजा रविवार १० एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायं ६ .०० झी टॅाकीजवर अवश्य घ्या.