(शरद लोणकर )-मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी टॉकीज महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०१९ पुरस्कार सोहळा सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत संपन्न झाला, तसंच या सोहळ्यात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्यदिव्य असा पार पडतो. यावर्षी या सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि वैभव तत्ववादी या प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी केले. प्रेक्षकांच्या अविरत प्रेमामुळे यावर्षी महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या त्यांच्या लाडक्या पुरस्कार सोहळ्याने ११व्या वर्षात पदार्पण केलं असून यंदा या सोहळ्यात १२ विविध कॅटेगरीजमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडके कलाकार अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मृणाल ठाकूर, शिवानी सुर्वे, अभिनय बेर्डे, भूषण प्रधान, प्रार्थना बेहरे, ललित प्रभाकर, दिग्दर्शक संजय जाधव, महेश कोठारे, गायक कुणाल गांजावाला, आदर्श शिंदे, संगीतकार अमितराज आणि इतर अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा रंगला.
झी टॉकीज महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०१९ पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘आनंदी गोपाळ’, ‘टकाटक’, ‘ट्रिपलसीट’, ‘हिरकणी’, ‘ये रे ये रे पैसा २’, ‘खारी बिस्कीट’, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. कुठला चित्रपट आणि कोणते कलाकार यावेळी बनणार ‘महाराष्ट्राचे फेवरेट’ हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.