झी टॉकीजने आजवर अनेक वैविध्यपूर्ण सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांचीच अभिरुची जपणाऱ्या झी टॉकीजने अॅनिमेशन सिनेमांचा खजिना पुन्हा एकदा बच्चेकंपनीसाठी आणला आहे. जगभरातील लोकप्रिय अॅनिमेटेड सिनेमे घरबसल्या मराठीतून बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना यानिमित्ताने मिळणार आहे. येत्या २९ मे पासून या सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
यामध्ये ‘कुंफू पांडा’, ‘मादागास्कर’, ‘हाऊ टू ट्रेन युवर ड्रगन’ आणि ‘रॅन्गो’ सारख्या उत्तमोतम अॅनिमेटेड चित्रपटांचा समावेश आहे. गेल्यावर्षीही झी टॉकीजवर प्रक्षेपित झालेल्या अॅनिमेशन चित्रपटांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. अॅनिमेशन चित्रपटांची ही जादुई दुनिया केवळ छोट्या मित्रांसाठीच नव्हे तर कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
यंदाही या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद अपेक्षित असल्याचं सांगत झी टॉकीजचे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, नाविन्यपूर्ण आशयाचे सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीत बनू लागले आहेत. झी टॉकीज वर झिंगाट अॅनिमेशन सिनेमांच्या खजिन्याद्वारे आम्ही मराठी चित्रपटक्षेत्रातील आणि या क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या सगळ्यांनाच उत्तम अॅनिमेटेड सिनेमे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. आगामी काळात मराठीत सुद्धा सर्वोत्तम दर्जाचे अॅनिमेटेड सिनेमे तयार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुंफू पांडामधील पांडा, मादागास्करमधील अॅलेक्स, मार्टी, ग्लोरिया, रॅन्गोमधील रॅन्गो या सगळ्यांनाच पुन्हा एकदा बघणे गमतीदार ठरणार आहे हे नक्की. झी टॉकीजवरील अॅनिमेशन चित्रपटांमुळे छोट्या दोस्तांची सुट्टी आणखीनच बहारदार होइल.
मनोरंजनाचा हा आगळा वेगळा धमाका झी टॉकीजवर २९ मे पासून रोज सकाळी ९ वाजता .

