‘जिथे मराठी तिथे झी मराठी’ असे धोरण असलेल्या आपल्या लाडक्या झी मराठी वहिनीने गेली २० वर्षे रसिक प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले आहे. रंजक विषय आणि सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी मराठी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून या वहिनीने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे.
येत्या रविवारी म्हणजेच २ सप्टेंबर ला झी मराठी प्रेक्षकांसाठी होम मिनिस्टर, लागीर झालं जी आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांचे १ तासांचे विशेष भाग सादर करणार आहे.
नाट्यगृहात ज्या चेटकिणीने थैमान घातला आहे म्हणजेच अलबत्या गलबत्या मधील अभिनेता वैभव मांगले त्यांच्या सौ सोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. तसेच लागीर झालं जी मध्ये अजिंक्य शीतलला १५ दिवसासाठी आसामला बोलावतो आणि हे जेव्हा भैय्यासाहेबाला कळतं तेव्हा तो शीतलला धमकी देतो अशावेळी शितली पुढे काय करणार आणि माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये राधिका मसालेची सक्सेस पार्टी प्रेक्षक पाहू शकणार आहेत.
रविवार २ सप्टेंबर रोजी होम मिनिस्टर संध्याकाळी ७ वाजता, लागीर झालं जी रात्री ८ वाजता आणि माझ्या नवऱ्याची बायको रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत.