लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट अर्थात ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका अल्पावधीतच
लोकप्रिय झाली. प्रेम विवाह झालेल्या जोडप्यांना आपलीशी वाटणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
समीर आणि मीराच्या नात्याची ही आगळीवेगळी कहाणी आता आली आहे एका नवीन वळणावर! लग्नाआधी
एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे हे दोघे आता एकमेकांनाच सहन करतायत असं चित्र निर्माण
झालंय. दोघांच्या घरच्यांनीही एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. समीर आणि मीराच्या नात्यातील कटुता
दूर करण्यासाठी आता मालिकेत एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. झी मराठी वर रविवार, २६ नोव्हेंबरला रात्री ९
वाजता ‘तुझं माझं ब्रेकअप’;च्या एका तासाच्या विशेष भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, नवीन
पात्राच्या आगमनाने समीर आणि मीराच्या नात्यात येणारं नवं वळण!
मीराला समीरच्या आयुष्यातून दूर लोटण्याची एकही संधी लता सोडत नाही. मीरासुद्धा लताचा प्रत्येक डाव
उधळून लावण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नांची शर्थ करतेय. एका तासाच्या विशेष भागात आपल्याला पाहायला
मिळेल, लताने मिरासमोर ठेवलेल्या १० जाचक अटींचं आव्हान आणि हे आव्हान परतून लावण्याचा मीरानं
केलेला निश्चय! दुसरीकडे समीर आणि मीराच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि लताला शह
देण्यासाठी येत आहे समीरची आजी (रोहिणी हट्टंगडी). मीराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि
लताचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आता समीरच्या आजीनं सूत्र आपल्या हातात घेतली आहेत.
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली’आईआजी’; आजही
रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता पुन्हा एका नव्या भूमिकेत आणि नव्या लुकमध्ये रोहिणी हट्टंगडी छोट्या
पडद्यावर आपल्याला दिसणार आहेत. समीरच्या आजीच्या भूमिकेत रोहिणीताई प्रेक्षकांच्या भेटीस येणार
आहेत.
आता समीरच्या आजीच्या येण्याने मीरा आणि समीरच्या नात्यात पुन्हा सुखाचे क्षण येतील का? लताने दिलेलं
आव्हान परतवून लावण्यात मीरा यशस्वी होईल का? या प्रश्नांची उत्तरं मिळतील, २६ नोव्हेंबरला रात्री ९
वाजता’तुझं माझं ब्रेकअप’च्या एका तासाच्या विशेष भागात!
समीर आणि मीराच्या नात्याला मिळणार नवं वळण!
Date:

