चला हवा येऊ द्या च्या मंचावर रविना टंडन

Date:

आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटात कम बॅक करत आहे. तिचा मातृ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने हजेरी लावली ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर. येत्या मंगळवारी १८ एप्रिलला रात्री ९.३० वा. हा भाग प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.

चला हवा येऊ द्या च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवुड मंडळींनी हजेरी लावली आणि याच मंचावर आता मस्त मस्त गर्ल रविनासुद्धा येणार आहे. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित मातृ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने थुकरटवाडीची वाट धरली यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली आणि कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गा्ण्यांवर नृत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. एकंदरीत धम्माल मजा मस्तीसोबतच एका संवेदनशिल विषयावर प्रकाश टाकणारा हा भाग येत्या मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

 

सोमवारच्या भागात चुकभूल द्यावी घ्यावीची टीम

चला हवा येऊद्या च्या सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका चूकभूल द्यावी घ्यावी मालिकेची टीम हजर राहणार आहे. ज्यात दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या कुलकर्णी मोने, प्रियदर्शन जाधव, सायली फाटक मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माती मनवा नाईक आणि दिग्दर्शक स्वप्ननील जयकर आदींचा समावेश होता. या अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी केलेली धम्माल येत्या सोमवारी रात्री ९.३० वा. बघता येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...