ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार बहाल

Date:

मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणारा, चित्रपटसृष्टीसह अवघ्या रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला. आपल्या हळव्या प्रेमकथेने आणि झिंगाट गाण्यांनी सर्वांनाच वेड लावणा-या सैराट चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांसहित आठ पुरस्कारांवर ‘सैराटने आपलं नाव कोरलं. डोळे दिपवून टाकणारा रंगमंच, त्यावर सादर होणारे रंगतदार नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांमधून वाहणारा सळसळता उत्साह अशा वातावरणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याचं आकर्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार. आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या कार्याची दखल घेणाऱ्या  आणि त्यांचा सन्मान करणाऱ्या  झी चित्र गौरव पुरस्काराची प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतील सर्वच मंडळी आतुरतेने वाट बघत असतात. या सोहळ्यात कोण बाजी मारतो याकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या पुरस्काराबाबतीतही ही उत्सुकता कायमच होती. मराठी रसिकांची मने जिंकलेले चित्रपट आता कोणता पुरस्कार जिंकतात याबद्दलची उत्कंठा उपस्थितांमधे होती. यंदा हाफ तिकीट, कासव, नदी वाहते, उबुंटू, वाय झेड, जाऊंद्याना बाळासाहेब, सैराट यांसह अनेक चित्रपटांना विविध विभागांत नामांकने मिळाली होती. यामध्ये सैराटने सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकाविले. याशिवाय इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता हा पुरस्कार अभिनेता आकाश ठोसरने तर गार्नियर नॅचरल प्रस्तुत मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनेत्री रिंकु राजगुरुने मिळविला.

 

 

 

यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारांमध्ये आकाश ठोसर (सैराट), गिरीश कुलकर्णी (जाऊंद्याना बाळासाहेब) आणि मकरंद अनासपुरे(रंगा पतंगा) यांच्यामध्ये चुरस रंगली आणि यात बाजी मारली ती गिरीश कुलकर्णी यांनी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रिंकू राजगुरु (सैराट), पर्ण पेठे (फोटोकॉपी) आणि इरावती हर्षे (कासव) यांच्यामध्ये बाजी मारली  ती इरावती हर्षेने.

नृत्याविष्काराचे अनोखे रंग

झी चित्र गौरवच्या या सोहळ्याला चार चांद लावले ते रंगतदार नृत्याविष्काराने. डोळे दिपवून टाकणारे देखावे आणि नृत्याच्या अदा दाखवणारे मराठमोळे कलाकार. प्राजक्ता माळी, श्रुती मराठे, वैभव तत्त्ववादी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, वैदही परशुरामी, रसिका सुनील या कलाकारांच्या देखण्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली. यातही सर्वांची दाद मिळवून  गेला तो अभिनय बेर्डेचा परफॉर्मन्स. आपले वडिल लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्याच गाण्यांतून अभिनयने आदरांजली दिली आणि त्याची साथ दिली ती लक्ष्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रींनी म्हणजेच किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, किशोरी अंबिये आणि निवेदिता सराफ. याशिवाय ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही रंगमंचावर येत अभिनयच्या सोबतीने आपल्या नृत्याची झलक दाखवली.

सीमाताईंना मानाचा मुजरा

‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘पाठलाग’, ‘वरदक्षिणा’, ‘सरस्वती चंद्र’, ‘आनंद’ अशा एक ना अनेक मराठी हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या सीमा देव यांना यावर्षीचा झी जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते. “आजवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कलाक्षेत्राची जेवढी सेवा करता येईल ती प्रामाणिकपणे केली. प्रेक्षकांनी वेळोवेळी त्यांच्या आवडीची पोचपावती दिली आणि आता हा पुरस्कार म्हणजे त्या सा-या मेहनतीचं गोड फळ आहे” असे मनोगत सीमाताईंनी व्यक्त केले. आपल्याला आदर्शस्थानी असलेल्या सुलोचनादीदींच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं याहून मोठा सन्मान असूच शकत नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी रंगमंचावर सीमाताईंचे दोन्ही सुपुत्र अजिंक्य व अभिनय देव तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

या रंगतदार सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी केलं. एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रंगात रंगवून टाकणारा असा हा भव्य दिव्य सोहळा येत्या २६ मार्चला सायंकाळी ७ वा. झी मराठी आणि झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध:एकनाथ खडसेंचा आरोप,महाजनांचाही जोरदार पलटवार

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी...

स्मार्ट सिटी च्या नावाने पुणेकरांची फसवणूकच -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी गाजावाजा केलेली...

सुट्टीच्या काळात प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस मालकांवर कारवाई करा -परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे- सुट्टीच्या काळात प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस मालकांच्या...