पुणे-रक्षाबंधनानिमित्त युवा माळी संघटनेच्यावतीने सारसबाग येथे अंध मुलांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी अंध मुलांना स्वादिष्ठ भोजन देण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत , दिलीप शेलवंटे , माजी नगरसेवक संदीप लडकत , संतोष लडकत , अर्चना वाडकर , सचिन आरु , प्रशांत दिंडोकर यांनी केले होते .