नेतृत्व करण्यासाठी निर्दयी असणे गरजेचे नाही- मुक्ता पुणतांबेकर 

Date:

पुणे : नेतृत्व करणे म्हणजे खूप कणखर किंवा निर्दयी असायला हवे असे नाही. महिला या पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात. कारण महिलांमध्ये  भावनिकता आणि इतरांची काळजी हे गुण उपजतच असतात. त्यामुळे नेतृत्व करताना त्या अतिशय संयमी असतात आणि इतरांची काळजी घेतात. त्यामुळेच ज्या क्षेत्रात महिलांचे नेतृत्व असते, तिथे त्या यशस्वी असतात असे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या महिला विभागाच्यावतीने राज्याच्या विविध भागातील महिला अध्यक्षांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील महिला नेतृत्वाच्या कार्यासाठी  महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिला अध्यक्षांचा ‘एम्प्रेस पुरस्कार’ देऊन  सन्मान करण्यात आला.  टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके आयएमए हाऊस येथे  पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी  इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच  इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र) महिला विभाग प्रमुख डॉ. वैजयंती पटवर्धन, पुणे ग्राहक मंचच्या माजी अध्यक्षा मधुगिता सुखात्मे, डॉ. रवींद्र कुटे, डॉ संतोष कुलकर्णी, आयएमए पुणे चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात भरारी या महिला अध्यक्षांच्या कार्याचा आढावा घेणा-या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सुहास पिंगळे म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या ६२ वर्षांच्या इतिहासात एकही महिला अध्यक्ष नाही याची खंत वाटते. महिलांनी पुढे लवकरच राज्य पातळीवर नेतृत्व करावे,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात डॉ. गिरीजा वाघ यांचे ॲनिमिया- नवीन दृष्टिकोन, तसेच स्मिता गणेश यांचे बदलते नातेसंबंध व आधुनिक नातेसम्बन्धान्चे समाजिक प्रश्न -या विषयावर व्याख्यान झाले.  त्यानंतर ‘भरारी घेताना’ हा परिसंवाद झाला. यामध्ये डॉ. अर्चना कोठारी, डॉ. विद्युत शाह, डॉ. सरिता देशपांडे, डॉ दीपा पावस्कर , डॉ. आशा जाधव, डॉ.उज्वला शिंदे, डॉ. सुरेखा काळे, डॉ.वैजयंती पटवर्धन सहभागी झाले होते. इंडियन मेडिकल असोसियेशन च्या महिला विभाग प्रमुख डॉ वैजयंती पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माधुरी राऊत;  डॉ.माया भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...