मोठ-मोठ्या सभा होत असताना तुम्ही दुसर्या ग्रहावर होता का?
चेन्नई-
कोरोना महामारीच्या सध्याच्या परिस्थितीला मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जबाबदार धरत चांगलेच फटकारले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सनिब बॅनर्जी म्हणाले की, कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाला निवडणूक आयोग जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा खटला चालवला पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर येत्या 2 मेला कोरोना नियमांचे पालन न करता मतमोजणी झाली तर, परिणामी आम्हाला ती थांबवावी लागेल, असेही ते म्हणाले.
मद्रास उच्च न्यायालय हे करुर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या संबंधित याचिकेवर सुनावणी करीत होते. दरम्यान, त्या दिवशी होणार्या मतमोजणीसाठी कोविड प्रोटोकॉलचा पालन केला जावा अशी मागणी याचिकेत केली गेली होती.संबंधित याचिकेतील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सनिब बॅनर्जी संतापले. त्यांनी आयोगाला प्रश्न करत विचारले की, जेव्हा निवडणुकीच्या सभा, रॅली होत होत्या, तेव्हां तुम्ही काय दुसर्या ग्रहावर गेला होतात की काय? निवडणुकीत होणार्या रॅलीमध्ये कोविड प्रोटोकॉल तोडत असताना तुम्ही का रोखले नाही. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीला तुमचा निवडणूक आयोग जबाबदार असून संबंधित अधिकार्यांवर खुनाचा खटला चालवला पाहिजे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार आहे.
मतमोजणीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या 6 प्रतिक्रिया
1. कोविड प्रोटोकॉल मतमोजणीच्या दिवशी लागू झाला आहे याची खात्री करा.
2. मतमोजणीचा दिवस कोणत्याही किंमतीवर राजकीय किंवा गैर-राजकीय कारणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये.
3. एकतर ही मतमोजणी पद्धतीने असेल किंवा ती पुढे ढकलले जाईल.
4. लोकांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. प्रशासनाला याची आठवण करून द्यावी लागते हे किती दुर्दैव.
5. जेव्हा नागरिक जिवंत राहतील, तेव्हाच त्यांना या लोकशाहीमध्ये मिळलेल्या हक्काचं उपयोग करु शकतील.
6. आजच्या परिस्थितीत जिवंत राहणे आणि लोकांना जिवंत ठेवणे महत्वाचे आहे, बाकी इतर सर्व गोष्टी या नंतर येतात.

