तसेच याच चौकातील वाहतूक बेटावर उभारण्यात आलेल्या ग्रंथ शिल्पालाही पुष्पमाला अर्पण करण्यात आली व ‘यशस्वी’ संस्थेच्या कार्यालयात मराठी भाषेचा गौरव सांगणाऱ्या कवी सुरेश भट यांच्या प्रसिद्ध ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ या कवितेचे जाहीर वाचन करण्यात आले आणि उपस्थितांना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या ‘मराठी’ भाषेच्या विशेषांकाच्या प्रती वितरित करण्यात आल्या.
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने ‘मराठी भाषा दिवस’ उत्साहात साजरा
पुणे : ‘यशस्वी’ संस्था व विभागीय माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विधी महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर चौकात त्यांच्या प्रतिमेला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड,जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच याच चौकातील वाहतूक बेटावर उभारण्यात आलेल्या ग्रंथ शिल्पालाही पुष्पमाला अर्पण करण्यात आली व ‘यशस्वी’ संस्थेच्या कार्यालयात मराठी भाषेचा गौरव सांगणाऱ्या कवी सुरेश भट यांच्या प्रसिद्ध ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ या कवितेचे जाहीर वाचन करण्यात आले आणि उपस्थितांना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या ‘मराठी’ भाषेच्या विशेषांकाच्या प्रती वितरित करण्यात आल्या.
तसेच याच चौकातील वाहतूक बेटावर उभारण्यात आलेल्या ग्रंथ शिल्पालाही पुष्पमाला अर्पण करण्यात आली व ‘यशस्वी’ संस्थेच्या कार्यालयात मराठी भाषेचा गौरव सांगणाऱ्या कवी सुरेश भट यांच्या प्रसिद्ध ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ या कवितेचे जाहीर वाचन करण्यात आले आणि उपस्थितांना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या ‘मराठी’ भाषेच्या विशेषांकाच्या प्रती वितरित करण्यात आल्या.
विशेष बाब म्हणजे या मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर चौकात संत ज्ञानेश्वर, कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी, विंदा करंदीकर, बा. सी. मर्ढेकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, ना. सी. फडके, मंगेश पाडगावकर, ग्रेस, पु. ल. देशपांडे, ना. धो. महानोर अशा विविध साहित्यिकांच्या प्रतिमा व त्यांच्या साहित्यकृतीमधील काही ओळींचे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे संचालक सुनील रामदासी, प्रशासन विभाग प्रमुख प्रसाद शाळीग्राम, संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका आदिती वाकलकर, मार्केटींग हेड प्रशांत कुलकर्णी, अमृता तेंडुलकर, अजय कुलकर्णी,जे.के.सहस्त्रबुद्धे व यशस्वी संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाम वायचळ, श्रीकांत तिकोने, अभिजित चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.