‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न
पुणे : युवकांची चौकटीबाहेर जाण्याची मानसिकता तयार करून जीवनात वेवेगळ्या वाटेने जाण्याची दिशा देण्याचे काम यशस्वी अकँडमी फॉर स्किल संस्था गेली अनेक वर्षे यशस्वीपणाने करीत आहे . हे नक्कीच उल्लेखनीय आहे असे संवाद लेखक अरविंद जगताप यांनी सांगितले.
संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणूंन ते बोलत होते. यावेळी ‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले . व्यासपीठावर संचालक राजेश नागरे, मल्हार करवंदे , तसेच अजय रांजणे ,मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरविंद जगताप पुढे म्हणाले की, युवक घडण्यासाठी यशस्वी सारखी संस्था असली पाहिजे,असे नमूद करून ते म्हणाले या संस्थेतील विद्यार्थी संख्या अधिक प्रमाणात वाढणे अपेक्षित आहे . आपले प्रश्न आपणच सोडवणे गरजेचे असून त्यासाठी अन्य जणांवर अवलंबून राहण्याची मानसिकता युवकांनी मनात ठेवायला नको तरच ते यशस्वी होतील . सध्याच्या काळात स्किल डेव्हलपमेंट ग्रामीण भागातील युवकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे आणि याविषयावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे . पण तसे प्रत्यक्षात मात्र होत नाही असे ते म्हणाले.
याप्रसंगी विविध कंपन्यांतून ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अरविंद जगताप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच ‘यशस्वी’ संस्थेतील काही कर्मचाऱ्यांचाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
संचालक राजेश नागरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीची माहिती सांगितली . हिना वानखेडे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. संचालक मकरंद करवंदे यांनी आभार मानले योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.” शिकता शिकता कमवू या “या समूह गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली . यावेळी विद्यार्थ्यानी नृत्य, गायन, एकपात्री अभिनय व काव्य वाचन असे विविध कलाप्रकार सादर केले. या कार्यक्रमासाठी सुनीता पाटील, वैशाली भुसारे, तेजस लवंगे, माधवानंद खांडेकर, सौमीन पात्रा, वर्षा इंगळे, कौस्तुभ कुलकर्णी, कल्याणी कबाडे, ऋतुजा लोखंडे,उर्मिला सातपुते,प्रशांत कुलकर्णी, राहुल कोल्हापुरे,निसार शेख,नागेश नाले आदींनी विशेष सहकार्य केले.