स्वावलंबी जीवनासाठी कौशल्य प्रशिक्षण गरजेचे : स्वाती पवार

Date:

महिला बंदिंसाठी कारागृहात ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्सला सुरुवात

पुणे : प्रत्येक महिलेने कौशल्य प्रशिक्षणाची कास धरल्यास त्यांना खऱ्या  अर्थाने  स्वावलंबी जीवन जगता येईल असे  मत  येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाच्या महिला तुरुंग अधिकारी स्वाती पवार यांनी व्यक्त केले.  येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे  अधिक्षक  यु. टी. पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शुक्रवारी  दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी  येरवडा  कारागृहात महिला बंदीच्या पुनर्वसनासाठी सुरु करण्यात आलेल्या  ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स चे उद्घाटन करताना  त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना  बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प संचालिका  वर्षा  कणिकदळे  म्हणाल्या की, कारागृहातील शिक्षा संपल्यानंतर  सामान्य नागरी जीवन जगताना पुरुषांच्या तुलनेत महिलांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांना सहकार्य मिळत नाही अशा अवस्थेत त्यांना स्वतःलाच स्वतःचा आधार बनण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची मोलाची मदत होऊ शकते, या विचारानेच महाराष्ट्र कारागृह विभागाच्या बंदी कल्याण आणि पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत  यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सहकार्याने महिला बंदीसाठी शिवणकाम क्षेत्रातील ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स सुरु करण्यात आला आहे.

एकीकडे शहरी जीवनमान वेगाने उंचावत असल्याने मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय  समाजातील युवती व महिलांमध्ये वेषभूषेच्या नवनवीन संकल्पना रुजू लागल्या आहेत. सातत्याने नवीन प्रकार पेहरावाच्या  बाबतीत पुढे येत आहेत. यामुळेच फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.  त्यामुळे महिला बंदींना जर हे प्रशिक्षण दिले तर पुढे जाऊन त्या अगदी सहजपणे समाजाच्या  मुख्य प्रवाहात सामील होऊन आपले नागरी जीवन सन्मानाने जगू शकतात. हा विचार केंद्रस्थानी ठेऊन सदर प्रशिक्षण देण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला बंदींमध्येही या प्रशिक्षणाबाबतीत उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

तर यावेळी बोलताना यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ म्हणाल्या की, हे प्रशिक्षण देण्याची संधी आम्हाला मिळत असल्याने आम्हालाही  एक समाधान मिळत असून या प्रशिक्षणादरम्यान स्वयंरोजगाराचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याप्रसंगी महिला तुरुंग अधिकारी मनीषा वालकोळी,  समाजसेविका  हिना सय्यद, मीनाक्षी बडवाईक, यशस्वी संस्थेच्या समन्वयक प्राची राऊत, प्रशिक्षक स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...