Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विद्यार्थीदशेतच उद्योगजगत समजून घेणे गरजेचे – राज गावडे

Date:

पिंपरी व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेषतः मनुष्यबळ व्यवस्थापन अर्थात एच.आर विभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच उद्योगक्षेत्र समजून घेणे गरजेचे असून  विविध औद्योगिक  आस्थापनांच्या घडामोडींचा अभ्यासही  करिअरच्या दृष्टीने निश्चित फायद्याचा  ठरेल, असे मत  दाना इंडिया प्रा. लि चे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक राज गावडे यांनी व्यक्त केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएमच्या पुणे विभागातील पहिल्या विद्यार्थी विभागाचे उदघाटन करताना निगडी येथील आयआयसीएमआर महाविद्यालयात बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, एनआयपीएम सारख्या मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेशी आयआयसीएमआरचा विद्यार्थी विभाग संलग्न होणे हि विद्यार्थ्यासाठी नक्कीच लाभदायक गोष्ट आहे.  या विभागाद्वारे क्रमिक अभ्यासक्रम शिकत असतानाच विविध  औद्योगिक  आस्थापनांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांशी चर्चा करता येईल, तसेच उद्योगजगतात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम, अर्थ आणि अन्वयार्थ तज्ञांकडून समजून घेता येईल, आणि प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी त्यावरचे उपाय याबाबतही अनुभवी मार्गदर्शन सहजगत्या उपलब्ध होईल.

याप्रसंगी बोलताना एनआयपीएमच्या पुणे विभागाचे उपाध्यक्ष कॅप्टन.डॉ. सी.एम.चितळे व लिअर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि चे मनुष्यबळ  व्यवस्थापक समीर कुकडे   यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्याना आपल्या अनुभवाचे दाखले देत उद्योगजगताची जाण पक्की करण्यासाठी स्वतःला कायम नवनवीन गोष्टींतून शिकत आपली कार्यशैली अद्ययावत  करणे गरजेचे असते हे सांगितले.

यावेळी ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ् अशोक गंधे यांनी एनआयपीएम  या संस्थेची सविस्तर माहिती सांगितली.  तर एनआयपीएमने विद्यार्थी विभाग सुरु करण्याचा पहिला बहुमान दिल्याबद्दल आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय  कुलकर्णी यांनी आभार व्यक्त करीत  आपल्या मनोगतातून विद्यार्थ्याना  या एनआयपीएम विद्यार्थी विभागात सक्रिय झाल्याने  स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावी करण्यास निश्चित मदत होईल असे सांगितले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात  दोन विद्यार्थ्यानीही हा विभाग सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत विद्यार्थ्याच्या अपेक्षा सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयसीएमआरच्या व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख ऍड. मनिषा  कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन  संस्थेच्या जनसंपर्क प्रमुख वहिदा पठाण  यांनी  आणि सूत्रसंचालन हिना सपारिया यांनी केले.

या कार्यक्रमाला एनआयपीएम पुणे विभागाचे सचिव नरेंद्र पाटील, वसंत सोमण यांच्यासह एनआयपीएमचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी प्रा.रम्या नायर व ‘यशस्वी’ संस्थेच्या आयआयएमएसचे ग्रंथपाल पवन शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी रशिया सोबत संबंधाची पायाभरणी...

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे ...

पुण्याचे मोहोळ जबाबदार:विमान प्रवाश्यांच्या हलाखीच्या स्थितीवर नाम फौंडेशन आणि राष्ट्रवादीच्या सोनाली देशमुख आक्रमक

परभणी:डीजीसीएने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन पत्रं पाठवली: इंडिगोला १८-२२% पायलट कमी...