पुणे – . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि जुने जाणते कामगारनेते यशवंत भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.भोसले हे काँग्रेसचे माजी महापौर योगेश बहल यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला धक्का देण्याबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीत भोसले यांच्या रुपाने बहलांची राजकीय नाकाबंदी करण्याचीही व्यूहरचना आखली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.कधीकाळी भोसले हे गोविंदराव आदिक यांचे जवळचे सहकारी म्हणूनही परिचित होते . त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी मोठा संघर्ष केलेले असे ते
पिंपरी, संत तुकारामगर येथील दिग्गज नेते आणि माजी नगरसेवक यशवंत भोसले यांनी आज कमळाचा झेंडा हातात घेतला. ठेकेदारी पद्धतीविरोधात त्यांनी वारंवार आवाज उठविला आहे .
यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, शहर सरचिटणीस प्रमोद निसळ उपस्थित होते.
योगेश बहल यांचे कट्टर विरोधक कामगारनेते यशवंत भोसले भाजपमध्ये
Date:

