रेल्वे संदर्भातील विविध मागण्यांसाठी खासदार बापट यांच्याकडून रेल्वे मंत्र्यांपुढे लेखी गाऱ्हाणे

Date:

घोरपडी येथील रेल्वेची जागा, पुणे – दौंड रेल्वे मार्गावर आरओबीसाठी पुणे महापालिकेला द्यावी तसेच इतर पुणे रेल्वे स्टेशनसह प्रश्न सोडविणेसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन. खा.बापट

पुणे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच पुणे येथील रेल्वे डीआरएम कार्यालयात पुणे शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांची पुणे विभागातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली असता खासदार गिरीश बापट यांनी घोरपडी येथील रेल्वेची जागा पुणे – दौंड रेल्वे मार्गावर आरओबीसाठी पुणे महापालिकेला द्यावी तसेच इतर पुणे रेल्वे स्टेशनसह प्रश्न सोडविणेसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन देवून विनंती केल्याचे खासदार बापट यांनी सागितले.
पुणे शहराच्या दृष्टीने पाच प्रमुख महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निवेदन देवून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांना सदरचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना करण्याबाबत विनंती केली. पुणे स्टेशनला पर्याय असणाऱ्या इतर रेल्वे स्टेशनवर जसे हडपसर रेल्वे स्टेशनला येणारे रस्ते रुंदीकरण करणे, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकरिता सुविधा उपलब्ध करून देणे, खडकी रेल्वे स्टेशनला टर्मिनल म्हणून विकसित करण्यासाठी आराखडा तयार करावा. पुणे – नाशिक रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करणेबाबत कार्यवाही करावी. पुणे स्टेशन येथील मालधक्का पुन्हा सुरू करणे. तसेच पुणे – दौंड रेल्वेमार्गावर घोरपडी येथे बांधण्यात येत असलेल्या आरओबीसाठी आवश्यक असणारी जागा रेल्वे विभागाने तातडीने देणेबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदनाद्वारे विनंती केल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...