पुणे :
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एस ए ई इंडिया ) चा पश्चिम विभाग ,ए .आर . ए . आय .,जॉन डिअर ,इटन टेक्नॉलॉजी ,कमिन्स इंडिया या संस्थांनी आयोजित केलेल्या ‘अ वर्ल्ड इन मोशन ‘-पुणे ऑलिम्पिक या वाहन मॉडेल निर्मिती स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे .
‘स्किमर ‘ या विभागात रामचंद्र गायकवाड शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले तर एस एन बीपी प्रशाला उपविजेती ठरली . ‘जेट टॉय ‘ विभागात वॉलनट स्कुल ने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले तर मोलेदिना हाय स्कुल ने उपविजेतेपद मिळविले . २१ शाळा सहभागी झाल्या
आन्सीस इंडिया चे संचालक (तंत्र विभाग ) अमित आगरवाल यांच्या हस्ते आणि एस ए इ इंडिया चे डॉ. के सी व्होरा यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला . जयश्री वेंकटरमण ,अनिता पानसरे ,सलील शेख ,अक्षय दुर्गे ,एन . पी . वाघ ,राकेश स्वामी ,संदेश पाटील ,अनिल कुमार उपस्थित होते .
पुणे ऑलिम्पिक मधील विजेते दिल्लीतील नॅशनल ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणार आहेत .

