तळजाईवर पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी कामे सुरु – कदम

Date:

पुणे- राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी वनमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तळजाई टेकडीवरून पावसाचे पाणी वेगाने खाली येऊन खालील वस्त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या टेकडीवर पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत २ तळी आणि काही बांध घालण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आल्याची माहिती नितीन कदम यांनी दिली .

ते म्हणाले,’मागील काही वर्षी पावसाळ्यामध्ये सहकार नंबर -२ येथील स्वानंद, सावरकर, क्रांती, क्षितिज,भोसले पार्क सोसायटी, सिंहगड रोड हिंगणे, खोराड वस्ती परिसरामध्ये तळजाई टेकडी वरून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वारंवार पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होत आले आहे. त्याकारणास्तव १५ एप्रिल रोजी वनमंत्री दत्तामामा भरणे यांना फोन करून सर्व विषयाची सविस्तर माहिती दिली,सोलापूरचे पालकमंत्री असल्यामुळे ते सोलापूर मध्ये होते, पण फोनवरील चर्चेनुसार तातडीने समस्या सोडवितो असे सांगून त्यांनी पुणे शहराचे वनविभागाचे DCF राहुल पाटील यांना फोन केला व पुढील अवघ्या १५ मिनिटांत मला RFO दिपक पवार यांचा फोन आला व १ तासात प्रत्यक्ष स्थळी त्यांच्या संपूर्ण टीम सोबत ते आले.

डॉ. अनंत भागवत, अविनाश सुर्वे, नितीन वाघ, अभय सोमण या स्थानिक नागरिकांसमवेत सर्व अधिकारी वर्गासोबत त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व समस्या व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देऊन पुढील २ दिवसांत काम चालू करतो असे सांगितले. याप्रसंगी मागील पुरामध्ये सौ. अतीतकर या ज्येष्ठ नागरिक आजी या भिंत पडून मृत्युमुखी पावल्या हि बाबही त्यांना सांगितली.

या सर्व महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन बोलल्याप्रमाणे पुढील दोन दिवसात वनविभागाकडून कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली व त्याप्रमाणे योग्य उपाययोजना म्हणून मोठी दोन तळी व ठिकठिकाणी बांध घालण्याची कामे सुरु झाली आहेत, जेणेकरून पावसाचे पाणी हे टेकडीवरच साठून पाणी जिरवण्यासही मदत होईल, पावसाचे पाणी 10 ते 20 टक्के खाली वाहून जाईल आणि पावसामुळे सोसायटीची जी भिंत पडली होती ती भिंतही वनविभागाच्यातर्फे बांधण्यात येणार आहे. यासर्व तत्पर कामामुळे भविष्यात सहकार नं-२ मधील स्वानंद, सावरकर, क्रांती, क्षितिज, भोसले पार्क सोसायटी परिसरामधील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल याचे समाधान आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...