सेवक समजून प्रशासकीय सेवेत कार्य करावे-निवृत्त मेजर जनरल डॉ बिपीन बक्षी

Date:

एमआयटी डब्ल्यूपीयूत सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रम

पुणे, १४ ऑगस्टः“ समाजातील समस्या शोधून तीने  विक्राळरूप घेण्याआधीच  तिला समूळ नष्ट केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी मालक नाही तर सेवक आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेत येणार्‍यांनी सेवकाची भूमिका बजवावी. प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकतेला महत्व दयावे. देशातील संपूर्ण  व्यवस्थेला प्रगत करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे.”असा सल्ला मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था (एमपी आयडीएसए) चे उपमहासंचालक व एव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त) मेजर जनरल (डॉ) बिपीन बक्षी यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणेतर्फे कोथरूड येथील  स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार व रूलर रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. तपण पांडे, स्कूल ऑफ सस्टेनेबल स्टडीजच्या संचालिका प्रा.अनामिका बिश्वास, डॉ. के. गिरीसन आणि डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
याप्रसंगी यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.
डॉ.बिपीन बक्षी म्हणाले,“आतंकवाद ही खूप मोठी समस्या आहे. सध्या बाहेरच्या देशातून ड्रोनच्या माध्यमातून पैसा पाठवून येथील शांती भंग करण्यात प्रयत्न केला जात आहे.  देशाला आधुनिक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. त्यामध्ये पोलिस विभाग, न्यायव्यवस्था आणि अन्य विभागांचा समावेश होतो. राष्ट्रीय सुरक्षा ही महत्वाचा मुद्दा असून त्यासाठी सर्व स्तरावरून कार्य होणे गरजेचे आहे.”
प्रदीप लोखंडे म्हणाले, “सदैव सकारात्मक विचाराधारेनी चालावे. या देशात १५ कोटी मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे २ किमीच्या आतमध्ये शाळा उघडल्या आहेत. त्याच प्रमाणे आज ग्रामीण क्षेत्रात ही मोठे परिवर्तन येत आहेत. येथे डिजिटल गोष्टी पोहचल्यामुळे भविष्यात आणखी मोेठे परिवर्तन पहावयास मिळेल.”
संजय नहार म्हणाले,“ या देशात आता विचारांनी क्रांती घडवायची आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेत येणार्‍या सर्वांनी संशोधनपर कार्य करून समाजात परिवर्तन घडवावे. मानवाची मनशक्ती ही सर्वात महत्वाची असून त्याआधारेच देशात क्रांती घडेल.”
त्यानंतर ‘२१ व्या शतकातील शासन’ या विषयावर दुपारी आयोजित सत्रात आयआयटी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे, टोटल सोल्यूशन्स ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक कपिल मल्होत्रा, टीसीएसचे उपाध्यक्ष दिनानाथ खोलकर,  डॉ. हेमा यादव आणि  लाईफ स्कूलचे संस्थापक नरेंद्र गोदानी यांनी विचार मांडले.
यावेळी मान्यवरांनी सांगितले की, न्यायपालिका,  कार्यकारी मंडळ, प्रसारमाध्यमे आणि विधिमंडळ या चार गोष्टी उत्तम शासन निर्मितीसाठी आवश्यक आहे. २१ व्या शतकातील सर्वात मोठे परिवर्तन म्हणजे माहितीचे आदान प्रदान होणे. येणार्‍या काळात सर्व कार्य हे पेपरलेस होतील. त्याच प्रमाणे वायरलेस तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जाईल. त्यासाठी ५जी ही व्यवस्था येत आहे. तसेच कृषी क्षेत्रात व्यवस्थापनाने मोठे परिवर्तन होत आहे.
बदलत्या काळानुसार व तत्काळ माहितीच्या आदान प्रदानामुळे देशात परिवर्तनाची लाट आली आहे. त्यात स्वच्छ भारत अभियान, हर घर में तिरंगा सारखी चळवळ जोर धरीत आहे. तसेच शिक्षणामध्ये ग्रामिण क्षेत्राशी जुळलेल्या पाठ्यक्रमांवर जोर देण्याची गरज आहे. प्रत्येकाने सकारात्मक विचाराने आज ‘कुछ कमाल करेंगे’ ही वाक्य लक्षात घेऊन रोज नवे कार्य करण्याचा सल्ला ही देण्यात आला आहे.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. डॉ. गौतम बापट व प्रा.चयनिका बासू यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...