पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “बेटी बचाव बेटी पढाव” या मोहिमे द्वारे स्त्री भ्रूण हत्या रोखणे,मुलींना वाचवणे आणि त्यांना शिक्षण देणे हे जसे महत्वाचे आहे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही गरजेचे आहे,आणि याच जाणीवेतून पुणे मनपा शाळेतील सुमारे २५००० विद्यार्थिनींना रुबेला लस देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे शिक्षण मंडळ अध्यक्ष सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.एरंडवण्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत या मोहिमेचा शुभारंभ आ.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी त्या बोलत होत्या.सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की “अनेक डॉक्टर्स शी चर्चा केली व या लसीची उपयुक्तता समजल्यावर मनपा आरोग्य प्रमुख व शिक्षण मंडळाची परवानगी घेऊन या मोहिमेस प्रारंभ केला आहे “मनपा च्या सर्व शाळांमध्ये टप्प्या टप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार असून सर्वप्रथम कोथरूड भागातील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना लस देण्यात येईल असे ही त्या म्हणाल्या.तसेच डॉक्टर्स च्या माध्यमातून या विषयी विद्यार्थिनींचे व पालकांचे प्रबोधन करूनच लस दिली जाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.निरामय आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हरसीटीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमास आ.मेधा कुलकर्णी,शिक्षण मंडळ अध्यक्ष श्रीमती वासंती काकडे,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,निरामय च्या सौ.दीपा कुलकर्णी,डॉ.संध्या तम्मेवार,रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हरसीटी च्या अध्यक्ष सौ.दीपा गाडगीळ,भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेचे प्रमुख दीपक मिसाळ,भाजप सरचिटणीस संदीप खर्डेकर,प्रशांत हरसुले,जगन्नाथ कुलकर्णी,कुलदीप सावळेकर,वर्षा डहाळे,गौरी करंजकर,राज तांबोळी,निलेश गारुडकर,अशोक शेलार,भारत कदम,भाग्यश्री ठिपसे,संगीता आदवडे,सुशीला साठे, ई मान्यवर उपस्थित होते.
आ.मेधा कुलकर्णी यांनी या उपक्रमास शुभेच्छा देताना मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उपक्रमाची सुरुवात आज जागतिक महिला दिनी होत असून हे कौतुकास्पद आहे.मनपा शाळेतील मुली या अत्यंत हुशार असून त्या खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत तितक्याच गुणवत्तापूर्ण असल्याचे ही त्यांनी नमोद केले.तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “महिलांना अधिक समान आणी सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.लग्न समारंभातील वाढू कडची मंडळी आज ही आमची मुलीची बाजू आहे असे म्हणतात,यातूनच स्त्रीस कमी लेखण्याची किवा दुय्यम वागणूक देण्याची समाजाची मानसिकता असल्याचे दिसून येते.यात बदल घडावा अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती वासंती काकडे यांनी स्त्रीच्या गर्भारपणात तिला कोणताही त्रास होवू नये याची काळजी घेण्याची सुरुवात या कोवळ्या वयातच केली पाहिजे व त्यासाठीच मनपा शाळेतील वय वर्ष १० ते १८ मधील सर्व मुलींना ही लस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ.तम्मेवार यांनी या लसीची उपयुक्तता आणि त्यापासून भावी काळात मुलींच्या आरोग्याचे होणारे रक्षण याचा तपशील सांगताना मुलींशी संवाद साधला व या लसीमुळे या वयातच रुबेला पासून रक्षण होते व मोठे झाल्यावर गर्भारपणात बाळाच्या वाढीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही असे सांगितले.
रोटरी क्लूब ऑफ पुणे युनिव्हरसीटी च्या अध्यक्ष सौ.दीपा गाडगीळ यांनी रुबेला फ्री पुणे ही मोहीम आम्ही राबवत असून सर्वप्रथम शिक्षण मंडळाच्या विद्यार्थीनीना लसीकरण करत असल्याचे स्पष्ट केले.या वेळी संदीप खर्डेकर व माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी केले,स्वागत मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे व सौ.उषा मोहोळ यांनी केले तर शर्मिला यांनी केले.


