पुणे -समाजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे अशी अपेक्षा खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी वडगाव शिंदे येथे एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली.वडगाव शिंदे येथील रस्ता, साकव पूल व बंदिस्त ड्रेनेज अशा विविध विकास कामांसाठी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण खासदार बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, कल्याण शिंदे, उपसरपंच उषा काकडे, ग्राम पंचायत सदस्य अशोक काकडे, अनिल काकडे, अविनाश गायकवाड, उल्का शिंदे, दिपाली शिंदे, शिवानी शिंदे, भाजपा वडगाव शेरी मंडल अध्यक्ष संतोष खांदवे, सुनील खांदवे-मास्तर, रावसाहेब राखपसरे, संदीप मोझे, ग्रामसेवक दयानंद कोळी उपस्थित होते.
बापट म्हणाले की सध्या समाजात काम करताना नागरिक असंख्य प्रश्न घेऊन येत असतात त्यातील बहुतांश प्रश्न महिला भगिनींना ज्ञात असतात आणि ते त्या चांगल्या प्रकारे सोडवूही शकतात. त्यामुळे यापुढे समाजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.
फेब्रुवारी 2020 पासून कोरोना सारख्या महामारीमुळे विकास कामे करण्यासाठी खासदार निधी मध्ये कपात करण्यात आल्यामुळे विकास कामे करण्यात अडचण येत होती. त्यातही उपलब्ध निधीमधून मतदार संघातील व मुख्यत्वे ग्रामीण भागात महत्त्वाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने खासदार निधी व जिल्हा वार्षिक योजनेतून वडगाव शिंदे मधील कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातील आंबेडकर नगर येथे ड्रेनेज व रस्ता करणे. व शिंदेवस्ती येथील रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व दहिवान वस्ती येथे साकव बांधणे, सुपाती वस्ती रस्ता सुधारणा करणे, वडगाव शिंदे येथे अंतर्गत रस्ते करणे, वडगाव शिंदे येथे अंतर्गत बंदिस्त गटार करणे, वडगाव शिंदे येथील स्मशान भूमी सुधारणा करणे, व लोहगाव -वडगाव शिंदे (इजिमा -१३८) रस्ता सुधारणा करणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच यापुढे गावातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे बापट यांनी सांगितले.
समाजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे -खासदार बापट
Date:

