पुणे-महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील, तर त्यांचे मन आणि मनगट दोन्हीही बळकट केले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरूडमधील शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी तर्फे आयोजित ‘स्त्री सशक्तीकरण पर्व-एक चळवळ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशनचे सचिव अभिजीत भोसले, आगाशे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. श्रद्धा नाईक, रा.स्व.संघाचे सुधीरजी जवळेकर, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, प्रभाग 13 अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, प्राची बगाटे, निलेश गरूडकर, नगरेसविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे, माधुरीताई सहस्रबुद्धे, यांच्यासह कोथरूड मंडलातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराविरोधात आंदोलने, निषेध मोर्चे आदी झालीच पाहिजेत. पण याहीपलिकडे जाऊन अशा घटनांचा प्रतिकार करण्यासाठी मुली आणि महिलांनी निर्भीड झाले पाहिजे. समाज परिवर्तन घडवण्यासाठी आणि आलेल्या प्रसंगावर हिमतीने मात करण्यासाठी महिलांनी सशक्त होणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच महिला प्रशिक्षण केंद्र पुणे आणि इतर भागात ठिकठिकाणी सुरू व्हावीत अशी इच्छा यावेळी दादांनी व्यक्त केली. संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या अशा सर्व प्रशिक्षण वर्गाचे पालकत्व मी घेईन असा शब्दही यावेळी दादांनी दिला.
यावेळी अकादमीचे प्रमुख आणि कोथरूड मंडल उपाध्यक्ष राजभाई तांबोळी आणि सरचिटणीस प्रा.अनुराधाताई येडके यांनी प्रशिक्षित केलेल्या 200 मुलींनी विविध प्रकारची मर्दानी खेळ आणि मल्लखांब यांची प्रात्यक्षिके सादर केली. हे पाहून कौतुकाची थाप म्हणून दादांनी संस्थेच्या एका अष्टपैलू मुलीस उत्स्फूर्तपणे स्वतःच्या हातातील घड्याळ भेट दिली. तसेच महिला सक्षमीकरणाचे कार्य असेच पुढे चालू रहावे, यासाठी संस्थेस एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोटस बिझनेस स्कुलचे कार्यकारी संचालक चारुदत्त बोधनकर सर आणि चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सोपान कांगणे सर यांनीही संस्थेच्या कामास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंतनू खिलारे आणि पल्लवी जोरी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग 13 ने केले होते.
महिलांचे मन आणि मनगट बळकट झाले पाहिजे – चन्द्रकांत दादा पाटिल
Date:

