अरबी समुद्रात स्वतंत्रपणे टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करत भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास

Date:

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022

पोरबंदर येथील नेव्हल एअर एन्क्लेव्ह,  स्थित भारतीय नौदलाच्या INAS 314 च्या पाच महिला अधिकार्‍यांनी 03 ऑगस्ट 2022 रोजी, डॉर्नियर 228 विमानातून  उत्तर अरबी समुद्रात  स्वतंत्र  टेहळणी  आणि देखरेख मोहीम पूर्ण करून इतिहास रचला. या पथकात सर्व महिला होत्या. महिलांची अशा प्रकारे स्वतंत्रपणे राबवण्यात आलेली ही पहिलीच मोहीम होती.  या विमानाच्या कॅप्टन, मोहिमेच्या प्रमुख  लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा होत्या.  त्यांच्या पथकात वैमानिक  लेफ्टनंट शिवांगी आणि लेफ्टनंट अपूर्वा गिते,  टॅक्टिकल अँड  सेन्सर अधिकारी, लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत होत्या. INAS 314 हे गुजरातमधील पोरबंदर येथे तैनात असलेले नौदलाचे  आघाडीचे  हवाई पथक असून अत्याधुनिक डॉर्नियर 228 सागरी टेहळणी विमानाचे परिचालन करते.  या हवाई पथकाचे नेतृत्व कुशल नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर असलेल्या कमांडर एस. के. गोयल यांच्याकडे आहे.

या ऐतिहासिक मोहिमेपूर्वी  महिला अधिकाऱ्यांना अनेक महिन्यांचे प्रशिक्षण आणि मोहिमेचे  सर्वसमावेशक बारकावे सांगण्यात आले होते.  .

भारतीय नौदल सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आघाडीवर आहे. महिला सशक्तीकरणाच्या या प्रभावी आणि अग्रगण्य उपक्रमांमध्ये महिला वैमानिकांची भर्ती, हेलिकॉप्टर परिचालनात  महिला हवाई संचालन अधिकाऱ्यांची निवड आणि 2018 मध्ये सर्व महिला असलेल्या पथकाची  सागरी जगपरिक्रमा,यांचा  समावेश आहे.

या प्रकारची ही पहिलीच लष्करी हवाई  मोहीम  अनोखी होती आणि त्यामुळे विमान परिचालन क्षेत्रातील  महिला अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारी स्वीकारण्याचा आणि अधिक आव्हानात्मक भूमिकांची आकांक्षा बाळगण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. संपूर्णपणे महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने  स्वतंत्रपणे  टेहळणी मोहीम  हाती घेणे हे सशस्त्र दलांसाठी  एक अनोखे यश आहे.

मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आणि संपूर्ण भारतातील तसेच जगातील लाखो महिलांना प्रेरणा दिल्याबद्दल आणि सर्व बंधनांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल या अधिकाऱ्यांचे खूप खूप  अभिनंदन.

“नारी शक्ती” चे खऱ्या अर्थाने दर्शन घडवणारी ही मोहीम होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...