पुणे- ज्यांनी गेल्या २७ जून २०२२ रोजी पुण्यात शिवसेनेचा मेळावयात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हटले होते , भाजपा हुकुमशाही कडे नेतो आहे, जे आपल्या विरोधात त्यांना त्रास देतो आहे, इडी व अन्य मार्गाने आपले विरोधक संपवतो आहे,बंडखोरी हे ठाकरे कुटुंबाविरुद्ध रचलेले षड्यंत्र आहे शिवसैनिकानो जागे राहा एकीने राहा ..तेच मावळातले खासदार श्रीरंग बारणे यांनी कशी पलटी मारली आणि थेट शिवसेना पक्ष प्रमुखांना कशी कलटी दिली ते त्यांच्या बंडखोरांना मिळाल्यानंतर आज केलेल्या माध्यमांशी संवादानंतर खूपच स्पष्ट झाले आहे आज ते काय म्हणाले आणि गेल्या महिन्यात ते काय म्हणाले होते ते पहा …