Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

300 आमदारांसह शहरी भागातील सर्वसामान्यांनाही मिळणार हक्काची घरं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत घोषणा

Date:

मुंबई -ग्रामीण भागातील जनतेला घरे देत आहोत. त्याचप्रमाणे शहरातील कष्टकऱ्यांनाही घर देणार असून सामान्यांच्या घरांसाठी सरकार कटीबद्ध आहे. झोपडपट्टीवासीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. 300 आमदारांनाही घरं बांधून देणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. सरकार केवळ बोलत नाही तर करून दाखविते, असे वक्तव्यही मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले, घोषणा झाली आता काम करणार आहे. बीडीडी चाळींचा विकास, मुंबईत येणारे नोकरदार, शिक्षणासाठी येणाऱ्यांना वस्तीगृह बांधणार आहोत. अकृषीक करातून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

कासवाच्या गतीपेक्षांही कमी गती प्रकल्पांची होती पण आमच्या सरकारने वेगाने प्रकल्प पुर्ण केले आहेत. फळ लागताहेत, पण ते कोण खातेय असा सुचक इशारा विरोधकांना देत कबाडकष्ट करण्यासाठी घरे मिळवुन देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबद्दल त्यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले.

झोपडपट्टी वासीयांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी सरकारी योजना आहेत. सर्वसामान्यांना घरं मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत. धारावीचा विकास व्हायला हवा. बाळासाहेबांचा पूत्र असल्याचा अभिमान वाटतो. योजना करायच्या म्हणून करायच्या नाही त्या सरकारला अमलात आणायच्या आहेत. 300 आमदारांनाही घरं बांधून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावाच्या वेळी केलेले निवेदन
  
आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसे असणार आहे ते ठरवण्याच्या दृष्टीने सहकारी मंत्रीमहोदयांनी जे मुंबईतील कष्टकरी आहेत,  जे दुसऱ्यांचे घरं बांधतात पण त्यांची स्वत:ची घरं नाहीत ते सांगितले आहे. मुंबईत अनेकजण येतात, अन्न वस्त्र निवारा शोधतात त्यांना अन्न वस्त्र मिळतं पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकायला त्यांच्याकडे स्वत:चं घर नसतं.
आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी जेंव्हा ९५ ला युतीची सत्ता आली  तेंव्हा या झोपडपट्टीवासिंयांना त्यांची हक्काचे मोफत घर मिळालीच पाहिजेत असा विचार मांडला आणि त्यादिशेने पाऊलं टाकायला सुरुवात केली
त्याच्यानंतर आज किती वर्षे झाली आपल्या सर्वांना कल्पना आहे, अनेक झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प सुरु झाले पण त्याची गती कासवगतीपेक्षा मंद राहिली.
आपण असं ऐकतो की, आजोबा नारळाचे झाड लावतात पण त्याचे फळ नातवाला मिळते असं आपण म्हणतो, आता नातवंडाच्या पुढेही दिवस जात चालले आहेत, फळं लागताहेत पण मलई कोण खाते आहे हा एक संशोधनाचा विषय आहे
त्यामुळे स्वत:ची हक्काची घरं सोडून जी माणसं ट्रॅन्झीक्ट कॅम्पमध्ये राहात आहेत, काबाडकष्ट करत आहेत त्यांना घर मिळवून देण्यासाठी ज्या योजना आणल्या त्यासाठी तीनही सहकारी मंत्र्यांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो.
मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार आतापर्यंत कुणीच केला नाही.
मुंबईचा सोन्याचा अंडे देणारी कोंबडी असा आतापर्यंत विचार केला गेला सोन्याचं अंडे देताहेत, अंडे घेऊन जाताहेत, पण त्या कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. ती निगा राखणाऱ्या, मुंबईसाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला  मग ते गिरणी कामगार असतील, इतर काबाडकष्ट करणारे असतील, ज्यांनी घाम गाळला, रक्त सांडले त्यांचा विचार कुणीच केला नव्हता तो विचार या सरकारने गांभीर्याने केला
हा विचार कागदावर न ठेवता प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे, त्या सरकारकडून हे मुद्दे मांडले गेले,  कामाला गती देण्यात आली आहे, त्यासाठी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मला अभिमान वाटतो.
या सगळ्या योजना आपण जाहीर केल्या, काही करायच्या आहेत पण त्या केवळ आपल्या हातात नाहीत. उदा. धारावीचा पुर्नविकास मला आठवतं मी अनेकदा सांगितले असेल की ज्यावेळी आम्ही कलानगरमध्ये राहायला आलो तेंव्हा चौफेर पसरलेली खाडी होती. विकास झाला, मोठमोठी ऑफीसेस झाली. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झालं, असं म्हणतात की जगातील सर्वात महागड्या जागेपैकी ती एक जागा आहे आणि त्याच्या बाजूला धारावी आहे, धारावीचा विकास झाला पाहिजे पण धारावीचा विकास अजूनही होऊ शकत नाही याचे कारण दुर्देवाने केंद्रासोबत आपली जी बोलणी सुरु आहेत, रेल्वेची जी जमीन आहे त्यासाठी जवळपास ८०० कोटी रुपये दिले गेले आहेत पण अजूनही ,ती जमिन आपल्याला हस्तांतरीत होत नाही. मी रेल्वेमंत्र्यांशी बोललो देखील आहे.
अशा काही अडीअडचणीच्या गोष्टी आहेत.
केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत त्या जागांचे काय केले पाहिजे, त्याचा कसा विनियोग केला गेला पाहिजे याचा नुसता विचार करून चालणार नाही तर केंद्राकडे पाठपुरावा करून त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे
मुंबईतील जनतेसाठी आपण हा  सगळा विषय मांडला. लोकांचं झालं मग लोकप्रतिनिधीचे काय?
३०० आमदारांसाठी घरे बांधणार. सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घरे देत आहोत त्याचाही आनंद आहे
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाची जी योजना आहे त्यामध्ये आम्ही अनेकदा गती देण्याचा विचार केला. त्यात हा ही विषय मांडला गेला की काही विकासकांनी लुट केली, लुबाडले, त्यांची चौकशी केली जाईल
ज्यांची घरे अडली त्यांचा काय दोष आहे, अशा रखडलेल्या घरांसाठी ॲम्न्स्टी स्कीम आणणार जेणेकरून रखडलेल्या घरांना चालना मिळेल.
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करून देशात सर्वात उत्तम उदाहरण उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार
विचार करून घोषणा केली, आता काम करणार
अनेक वर्षे रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न आपण सोडवला, बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाला सुरुवात झाली
नोकरदार महिला आणि शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसाठी वसतीगृह बांधतो आहोत
म्हाडाचे सेवाशुल्क किंवा अकृषक कर यामुळे अडकलेल्या रहिवाशांना आपण दिलासा देत आहोत
मुंबई स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी जे काम करतात त्या सफाई कामगारांसाठी ही आपण विचार केला आहे.
मुंबईतील महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे की ज्याप्रमाणे आपण ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला आपण घर देत आहोत, शहरात राहणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण घर देत आहोत  त्याचप्रमाणे आपण सफाई कामगारांना देखील घरे देत आहोत
महाविकास आघाडीचे सरकार केवळ बोलणारे नाही तर जे बोलतो ते करून दाखवणारे सरकार आहे. या मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या व मंत्रिमंडळातील सहकाऱ्याच्यावतीने देतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...