Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास!

Date:

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.

86.67 मीटर थ्रोसह चेकच्या जाकुब वेदलेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 85.44 मीटर थ्रोसह चेकचे वितेस्लाव वेसेली तिसऱ्या क्रमांकावर आहे. नीरजने क्वालिफाइंग राउंडमध्ये 86.65 मीटर थ्रो केला होता आणि आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या नंबरवर होता.

दक्षिण कमांडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी  अभिनंदन केले
 
 नीरज चोप्रा यांनी आपले प्रशिक्षण पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट मध्ये   केले आहे.  सुभेदार नीरज मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांदरा गावातल्या शेतकरी कुटुंबातले आहे.   26 ऑगस्ट 2016 साली, नायब सुभेदार पदावर भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून ते रुजू झाले . नीरजला 2018 साली अर्जुन पुरस्कार आणि 2021 साली त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल, तसेच भारतीय लष्कर आणि संपूर्ण देशाचा गौरव वाढवल्याबद्दल,  दक्षिण कमांडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी  अभिनंदन केले आहे. 

भारताचे आतापर्यंतचे 10 वे सुवर्ण
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये 8 आणि नेमबाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. अशा प्रकारे, हे भारताचे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.

13 वर्षांनंतर भारताला सुवर्ण
ऑलिम्पिक स्पर्धेत 13 वर्षानंतर भारताला एखाद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाले होते. बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.

भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक
हे भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली होती. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. नीरजच्या सुवर्ण व्यतिरिक्त मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक आणि बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले आहे.

जर्मन कोचकडून घेतली ट्रेनिंग
नीरज चोप्राने आपले थ्रोइंग स्किल्स आणखी चांगले बनवण्यासाठी जर्मनीचे बायो मेकॅनिक्स एक्सपर्ट क्लाउस बार्तोनित्ज यांच्याकडून ट्रेनिंग घेतली. तेव्हापासून नीरज सलग चांगले परफॉर्म करत आहे.

यापूर्वी 5 मोठ्या इव्हेंटमध्ये जिंकले गोल्ड
इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असलेल्या नीरजने ऑलिम्पिकपूर्वी 5 मेगा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्याने एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, साउथ एशियन गेम्स आणि वर्ल्ड जुनिअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहेत.

वजन कमी करण्यासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये
नीरज चोप्रा हरियाणाच्या पानीपत येथील रहिवासी आहे. त्याने मुळात वजन कमी करण्यासाठी अ‍ॅथलेटिक्सची निवड केली होती. यात अगदी कमी वेळातच स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून नीरजने मागे वळून पाहिले नाही. अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगल्या परफॉर्मंसमुळेच 2016 मध्ये भारतीय लष्कर जॉइन केले.

नीरज चोप्रा वैयक्तिक माहिती :

क्रीडाप्रकार : पुरुष भालाफेक स्पर्धा

जन्मतारीख :  24 डिसेंबर, 1997

मूळ रहिवासी : पानिपत, हरियाणा

प्रशिक्षण केंद्र: SAI NSNIS पतियाला

सध्याचे प्रशिक्षण केंद्र : उपासाला, स्वीडन

राष्ट्रीय प्रशिक्षक : डॉ क्लाउस बर्तोनेझ

हरियाणाच्या खान्दरा गावाचा रहिवासी असलेल्या नीरजचे वजन तो  12 वर्षांचा असतांना  खूप जास्त होते, त्यामुळे त्याच्या घरचे लोक, त्याला कुठला तरी खेळ खेळत जा, म्हणून आग्रह करत असत. शेवटी त्यांच्या आग्रहाखातर नीरजने पानिपत येथील शिवाजी क्रीडा संकुलात जाण्यास सुरुवात केली.  तिथे त्याने काही वरिष्ठ खेळाडूंना भालाफेक खेळतांना पहिले आणि त्यानेही या खेळात आपले नशीब आजमावण्याचे ठरवले. सुदैवाने हा खेळ त्याला आवडू लागला आणि नंतर त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी त्याने प्रचंड परिश्रम घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर, 2018 च्या राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेत तो भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला भालाफेकपटू ठरला.

कामगिरी :

– सुवर्ण पदक, आशियाई क्रीडास्पर्धा  2018

– सुवर्ण पदक, राष्ट्रकुल  क्रीडास्पर्धा 2018

– सुवर्ण पदक, आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद 2017

– सुवर्ण पदक, जागतिक U-20 अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद 2016

– सुवर्ण पदक, दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धा  2016

– रौप्य पदक, आशियाई ज्युनियर अजिंक्यपद 2016

– सध्याचा राष्ट्रीय विक्रम (88.07m – 2021)

– सध्याचा जागतिक ज्युनिअर विक्रम (86.48m – 2016)

सरकारची मदत :

– युरोपात प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी व्हिसा मिळवण्यात सहकार्य

– क्रीडा साहित्य घेण्यासाठी वित्तीय सहाय्य

– राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात तसेच परदेशीही त्याच्यासाठी बायो-तज्ञ आणि प्रशिक्षकाची व्यवस्था करणे.

– दुखापत व्यवस्थापन आणि पुनर्वसन

– 26 आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिकसाठी अर्थ सहाय्य

निधी (2016 रिओ ऑलिम्पिक ते आतापर्यंत  )

TOPS: Rs. 52,65,388 सुमारे                                                                               

ACTC: Rs. 1,29,26,590 सुमारे

TOTAL: Rs. 1,81,91,978 सुमारे.

प्रशिक्षक माहिती :

a) प्राथमिक पातळी: जाई चौधरी

b) द्वितीय पातळी :स्व गैरी  आणि उवे होन  c) वरिष्ठ पातळी :डॉ क्लाउस बर्तोनेझ

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...